ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. ३० - जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यात चक्क टेकड्यांवर चरी खणून पाणी अडविण्याचा उपक्रम राबविण्यात आला आहे. यामुळे येथील भूजल पातळी वाढण्यास मदत मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी याची दखल घेतली असून यासंदर्भात जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांचे ट्विटरवर अभिनंदन देखील केले आहे.काटोलमधील टेकड्यांवर पावसाचे पाणी अडवण्यासाठी चरी खणण्यात आल्या. त्यामध्ये पावसाचे पाणी अडवून जिरवले जाते. प्रायोगिक तत्वावर काटोल तालुक्यात ही योजना राबवण्यात आली. एरवी पावसाचे पाणी टेकड्यांवरुन वाहून जाते. त्याचा काहीही उपयोग होत नाही. मात्र या चरींमुळे पाणी मुरण्यास मदत मिळेल व भूगर्भातील पाण्याची पातळी वाढेल. याच कामगिरीचे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले आहे. याचा व्हिडिओदेखील सोशल मिडीयावर प्रसिद्ध झाला आहे.
नागपूरमध्ये पाणी अडविण्यासाठी टेकड्यांवर चरी
By admin | Updated: June 30, 2016 20:10 IST