शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरमध्ये मेट्रो प्रवासाची लवकरच स्वप्नपूर्ती!

By admin | Updated: August 10, 2014 01:54 IST

विकासाच्या दिशेने वाटचाल सुरू असलेल्या नागपूर शहरातील मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 21 ऑगस्टला भूमिपूजन होत आहे.

नागपूर : विकासाच्या दिशेने वाटचाल सुरू असलेल्या नागपूर शहरातील मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 21 ऑगस्टला भूमिपूजन  होत आहे. या प्रकल्पामुळे विकासाला गती मिळणार आहे. सोबतच  25 लाख नागरिकांची मेट्रो रेल्वे प्रवासाची स्वप्नपूर्ती होणार आहे.
नागपूर शहरातील दोन मेट्रो मार्गाना यापूर्वी मंजुरी देण्यात आली आहे. शहरातील ऑटोमोटिव्ह चौक ते मिहान आणि प्रजापतीनगर ते लोकमान्यनगर असे दोन मेट्रोमार्ग आहेत. या मार्गाची एकूण लांबी 38.2 किलोमीटर आहे. सहा वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहे. या संपूर्ण प्रकल्पासाठी सुधारित प्रस्तावानुसार  1क्526 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. 
दिल्ली मेट्रोरेल कॉर्पोरेशन कंपनी यांनी नागपूर मेट्रो रेल्वेचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला आहे. या दोन्ही मार्गिकांच्या प्रस्तावाला केंद्र शासनाने तत्त्वत: मान्यता दिली आहे. नागपूर मेट्रोसाठी नागपूर मेट्रो कॉर्पोरेशन लिमिटेड नावाने एक स्पेशल पर्पज व्हेईकल (एसीव्ही) कंपनी स्थापन करण्यात आली आहे. नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लि. या कंपनीस या प्रकल्पाच्या अंमलबजावणी संदर्भातील अधिकार  देण्यात येणार आहे. तसेच ही कंपनी स्थापन होईर्पयत नागपूर सुधार प्रन्यास (नासुप) या प्रकल्पासाठी कार्यान्वयीन संस्था म्हणून काम पाहत 
आहे.  (प्रतिनिधी)
 
केंद्राकडून अद्याप पत्र नाही
मेट्रोरेल्वे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. यातून शहर विकासाला चालना मिळणार आहे. सरकारने यापूर्वी या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. केंद्राकडे प्रस्ताव पाठविला आहे. परंतु मंजुरी संदर्भात नासुप्रला पत्र मिळाले नसल्याची माहिती नासुप्रचे सभापती प्रवीण दराडे यांनी दिली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमाची अद्याप सूचना मिळाली नसल्याचे त्यांनी सांगितले.