शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर - ई-रिक्षा, ई-कार्टवर कारवाई करू नका

By admin | Updated: September 2, 2016 20:39 IST

ई-रिक्षा (प्रवासी वाहन) व ई-कार्ट (मालवाहू वाहन) या वाहनांवर कारवाई करू नका असे मौखिक निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी राज्य शासनास दिलेत

- ऑनलाइन लोकमत
हायकोर्टाचे मौखिक निर्देश : परिवहन आयुक्तांना समन्स बजावण्याची तंबी
नागपूर, दि. 2 - ई-रिक्षा (प्रवासी वाहन) व ई-कार्ट (मालवाहू वाहन) या वाहनांवर कारवाई करू नका असे मौखिक निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी राज्य शासनास दिलेत. तसेच, जप्त केलेले ई-रिक्षा व ई-कार्ट सोडण्यास सांगून यापुढे अशी चूक झाल्यास परिवहन आयुक्तांना समन्स बजावण्याची तंबी दिली. 
 
राज्याच्या परिवहन विभागाने ई-रिक्षा व ई-कार्टविषयी उदासीन भूमिका घेतली असल्याचा आरोप न्यायालयात प्रलंबित एका जनहित याचिकेत करण्यात आला आहे. विदर्भ सायकल रिक्षा चालक संघाचे उपाध्यक्ष अनिल टेंभेकर यांनी ही याचिका दाखल केली आहे. याचिकेवर न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व विनय देशपांडे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, न्यायालयाने ई-रिक्षा व ई-कार्टला परवाने देण्याचे धोरण अंतिम होण्यापूर्वीच या वाहनांवर कारवाई करण्यात आल्यामुळे शासनावर नाराजी व्यक्त केली. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाने ई-रिक्षा व ई-कार्टला परवान्याच्या बंधनातून वगळले आहे. यासंदर्भात ३० आॅगस्टच्या राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. मोटर वाहन कायदा-१९८८ मधील कलम ६६ (१) मध्ये परवान्यासंदर्भात तरतूद आहे. ही तरतूद कायद्यातील कलम २-ए अनुसार असलेल्या ई-रिक्षा व ई-कार्टला लागू होणार नाही असे आदेश सर्व राज्य शासनांना देण्यात आले आहेत. परंतु, राज्य शासनांना ही वाहने विशिष्ट रोडवर किंवा परिसरातच चालविण्याचे बंधन कायद्यानुसार लागू करता येऊ शकते. अधिसूचनेत ही बाबही स्पष्ट करण्यात आली आहे. या अधिसूचनेची माहिती न्यायालयाला केंद्र शासनातर्फे देण्यात आली. या प्रकरणावर आता १५ सप्टेंबर रोजी पुढील सुनावणी निश्चित करण्यात आली आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. फिरदोस मिर्झा तर, केंद्र शासनातर्फे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल रोहित देव यांनी बाजू मांडली. 
 
राज्य शासनातर्फे नवीन जीआर जारी
राज्य शासनाने ई-रिक्षा व ई-कार्टला नियमांतर्गत परवाने देण्यासंदर्भात शुक्रवारी नवीन ‘जीआर’ जारी केला. हा ‘जीआर’ मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरण क्षेत्र वगळता उर्वरित राज्यात लागू आहे. याविषयी आधी सहा जिल्ह्यांपुरता मर्यादित ‘जीआर’ जारी करण्यात आला होता. न्यायालयाने फटकारल्यामुळे जुना ‘जीआर’ मागे घेऊन नवीन ‘जीआर’ जारी करण्यात आला आहे. मुख्य सरकारी वकील भारती डांगरे यांनी या ‘जीआर’ची माहिती न्यायालयाला दिली.