शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरात भाजप, काँग्रेसला नको मित्रपक्षांची साथ,

By admin | Updated: July 10, 2016 19:24 IST

विधानसभा निवडणुकीत आघाडी अन् युती तुटली. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना हे चारही प्रमुख पक्ष स्वबळावर लढले

ऑनलाइ लोकमतनागपूर, दि. १० : विधानसभा निवडणुकीत आघाडी अन् युती तुटली. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना हे चारही प्रमुख पक्ष स्वबळावर लढले. आता येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीतही आघाडी व युती होण्याची शक्यता कमीच आहे. मित्रपक्षासाठी जागा सोडण्यापेक्षा आपल्या स्थानिक कार्यकर्त्याला उमेदवारी देऊन बळ देण्याचा काँग्रेस व भाजपचा विचार आहे. चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने महापालिकेची निवडणूक होणार असल्यामुळे युती किंवा आघाडी करून काहीच फायदा होणार नाही, असे या दोन्ही पक्षातील नेत्यांचे मत आहे.महापालिकेच्या गेल्या निवडणुकीत काँग्रेस- राष्ट्रवादी व भाजप- शिवसेना युती करून लढली. जागा वाटपाच्या वेळी भाजपला काही महत्त्वाच्या जागा शिवसेनेच्या हट्टासाठी सोडाव्या लागल्या. तर काँग्रेसलाही राष्ट्रवादीसाठी एक पाऊल मागे घ्यावे लागले. स्वत:कडे पर्यायी तगडे उमेदवार असलेल्या तसेच जिंकण्याची शक्यता असलेल्या जागा मित्रपक्षांसाठी सोडल्यामुळे काँग्रेस व भाजपला नुकसान सहन करावे लागले. काही जागा अशा होत्या की त्या ठिकाणी काँग्रेस, भाजपा लढली असती तर विजय नोंदविला असता. मात्र, राष्ट्रवादी व शिवसेनेसाठी सोडण्यात आल्यामुळे गमवाव्या लागल्या. विशेष म्हणजे गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीला सहा व शिवसेनेलाही सहाच जागा जिंकता आल्या. मात्र, आता या सहा जागांसाठी २५ ते ३५ जागांसाठी तडजोड करण्यास काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षांचे नेते तयार दिसत नाहीत. चार सदस्यीय प्रभाग पद्धतीत सहज विजय मिळविता येईल, अशी शिवसेना व राष्ट्रवादीची शहरात स्थिती नाही. दोन्ही पक्षाचे काही नगरसेवक व काही इच्छुक कार्यकर्त्यांमध्ये स्वबळावरही विजयी होण्याची क्षमता आहे. मात्र, सर्वच प्रभागात असे चित्र नाही. त्यामुळे या दोन्ही पक्षांचे नेते आघाडी व युतीसाठी इच्छुक असल्याचे जाणवते. नुकत्याच झालेल्या भाजपच्या शहर कार्यकारिणीच्या बैठकीत नेत्यांनी उघडपणे ह्यएकला चलोरेह्णचा नारा दिला. आपल्याच पक्षात सक्षम कार्यकर्ते आहेत, त्यामुळे आता इतरांशी हातमिळवणी कशासाठी करायची, नागपुरात शेवटच्या घटका मोजत असलेल्या शिवसेनेशी युती करून ग्लुकोज कशासाठी द्यायचे, असे प्रश्न उपस्थित केले होते. मात्र, यावर शिवसेनेकडून कुठलेही उत्तर देण्यातआले नाही. शिवनसेना नेत्यांनी सोयीस्कर मौन बाळगले. त्यामुळे भाजपचे मनोबल आणखी उंचावले आहे.