शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात सेनेचा राडा!

By admin | Updated: February 14, 2015 06:06 IST

व्हॅलेन्टाइन्स डे’ला विरोध दर्शवत शिवसैनिकांनी उपराजधानीत अनेक ठिकाणी गुंडगिरी करीत तरुण-तरुणींना शिवीगाळ केल्याचा प्रकार शुक्रवारी घडला़

नागपूर : ‘व्हॅलेन्टाइन्स डे’ला विरोध दर्शवत शिवसैनिकांनी उपराजधानीत अनेक ठिकाणी गुंडगिरी करीत तरुण-तरुणींना शिवीगाळ केल्याचा प्रकार शुक्रवारी घडला़ संस्कृती रक्षणाच्या नावाखाली शिवसैनिकांनी सायंकाळी फुटाळा, बॉटनिकल गार्डन, अंबाझरी उद्यान तसेच रस्त्यांवर अक्षरश: धिंगाणा घालत काही तरुणींचा विनयभंग केला, शिवीगाळ केली, स्कार्फ ओढला अन् तरुणांनाही मारहाण केली. या घटनेमुळे तरुणाईमध्ये प्रचंड संतापाची भावना असून,सर्वत्र गुंडगिरीचा निषेध होत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे हा प्रकार सुरू असताना पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली होती. ‘व्हॅलेन्टाईन डे’ला विरोध करण्यासाठी ६० हून अधिक शिवसैनिक फुटाळा परिसरात एकत्र आले. ‘बॉटनिकल गार्डन’मध्ये शिरले अन् तेथे असलेल्या युगुलांमध्ये पळापळ सुरू झाली. त्यांनी काही जणांना घेरले अन् मुला-मुलींना चेहऱ्यावरून ‘स्कार्फ’ बाजूला करण्याचे फर्मान सोडले. एका तरुणीचा ‘स्कार्फ’ काढण्यापर्यंत त्यांची मजल गेली. यानंतर त्यांचे छायाचित्रदेखील काढण्यात आले. काही युगुलांना उठाबशा काढायला लावल्या. अंबाझरी उद्यानात कार्यकर्त्यांनी अशाच प्रकारे गोंधळ घालत सहज बोलत बसलेल्या काहीजणांना कान पकडायला लावले. मिळेल ते जोडपं किंवा अगदी मुलगी एकटी असेल तरी त्यांना घेरून व अक्षरश: त्यांना अडवून या कार्यकर्त्यांकडून शिवीगाळ करण्यात आली. (प्रतिनिधी)