शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
2
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
3
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
4
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
5
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
6
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
7
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
8
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
9
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
10
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
11
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
12
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
13
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
14
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
15
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
16
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
17
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
18
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
19
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
20
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!

नागपूर : अणेंच्या 'विदर्भ माझा'ला नगरपरिषदेत यश

By admin | Updated: January 9, 2017 12:17 IST

महाराष्ट्रातील भाजपाचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपूरमध्ये विदर्भ माझा पक्षाने दणक्यात सुरूवात केली आहे.

ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. ९ - विदर्भातील नागपूर जिल्ह्यातील ९ आणि गोंदियामधील २ नगरपरिषद निवडणुकीतील मतमोजणीला सकाळी 10 वाजता सुरुवात झाली आहे.  श्रीहरी अणेंच्या विदर्भ माझा पक्षाने चांगली सुरुवात केली आहे. महाराष्ट्रातील भाजपाचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपूरमध्ये विदर्भ माझा पक्षाने काटोलमध्ये 4 जागांवर विजय मिळवला असून तर 3 जागांवर आघाडीवर चालत आहे. नगराध्यक्षपदासाठीही विदर्भ माझाच्या वैशाली ठाकूर आघाडीवर आहेत. 
 
 रामटेक नगरपालिकेत भाजपाने शिवसेनेला धक्का देत सत्ता  मिळवली आहे. १७ जागांपैकी १३ जागांवर भाजपने विजय मिळवला आहे. तर शिवसेना आणि काँग्रेस यांना प्रत्येकी २ जागांवर समाधान मानावे लागले. रामटेकचे नगराध्यक्षपदी भाजपाचे दिलीप देशमुख विजयी झाले आहेत. 
 
 
जिल्ह्यातील नरखेड, काटोल, कळमेश्वर, मोहपा, सावनेर, खापा, कामठी, रामटेक आणि उमरेड नगर परिषदेच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांसाठी रविवारी मतदान पार पडले. एकूण ३३१ विविध मतदान केंद्रांवर सरासरी ७३.०३ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीसाठी खुद्द मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रचारसभा घेतल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली आहे. मतदान प्रक्रियेदरम्यान काटोल वगळता कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.