- जिल्हा पुरवठा विभागाची कारवाईनागपूर : बाजारात तूर डाळीच्या वाढत्या भाववाढीवर नियंत्रण आणण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हा पुरवठा विभागाने मंगळवार, १९ जुलैला कामठी तालुक्यातील मौजा भोवरी येथील खंडेलवाल वेअर हाऊसच्या गोदामावर टाकलेल्या धाडीत १४७ क्विंटल तुरीचा साठा जप्त केला. कामठी तालुक्यातील मौजा भोवरी येथे खंडेलवाल वेअर हाऊस या नावाने अन्नधान्य साठवणुकीचे गोदाम असून त्या ठिकाणी हचोडा (तेलंगाना) येथील रहिवासी रेहमान सेठ यांनी १४७ क्विंटल तुरीचा साठा अनधिकृतपणे साठवल्याचे आढळून आले. जिल्हा पुरवठा विभागाच्या पथकाने कारवाई करून हा साठा जप्त केला.जप्त साठ्याची अंदाजे किंमत प्रति क्विंटल ८३०० रुपयेप्रमाणे १२ लाख २० हजार रुपये आहे.
नागपूरात १४७ क्विंटल तुरीचा साठा जप्त
By admin | Updated: July 19, 2016 20:11 IST