शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

‘सैराट’च्या शेवटाची चर्चा नागराजनेही केली नाही - पवार

By admin | Updated: July 22, 2016 03:23 IST

सैराट सिनेमा सर्वांनी डोक्यावर घेतला. मात्र या सिनेमाच्या शेवटाची चर्चा कोणीच केली नाही.

मुंबई : सैराट सिनेमा सर्वांनी डोक्यावर घेतला. मात्र या सिनेमाच्या शेवटाची चर्चा कोणीच केली नाही. महत्त्वाचे म्हणजे चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक नागराज मंजुळे हेदेखील ‘सैराट’च्या शेवटाची चर्चा करताना दिसत नाहीत, अशी खंत साहित्यिक व नाटककार संजय पवार यांनी व्यक्त केली.दादर येथे विजय सातपुते यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त सत्यशोधक महाराष्ट्र पत्रिकेतर्फे ‘सैराट : सिनेमाच्या पलीकडे’ या विषयावर बुधवारी सायंकाळी आयोजित परिसंवादात संजय पवार बोलत होते. या वेळी स्त्री चळवळीच्या अभ्यासक प्रतिमा परदेशी, आंबेडकरवादी कार्यकर्ते सुरेश सावंत आणि स्त्रीमुक्तीवादी जेष्ठ कार्यकर्त्या लता प्र. म. उपस्थित होत्या.प्रतिमा परदेशी यांनी सैराटमधील अब्राह्मणी सौंदर्यशास्त्रावर भाष्य केले. त्या म्हणाल्या, स्त्रियांना प्रेम व्यक्त करण्यासाठी जागा नाही. मात्र सैराटमुळे मुली प्रेम व्यक्त करू लागल्या आहेत. तसेच आंबेडकरी चळवळीतील लोकांनी सैराटचा शेवट गांभीर्याने घेतला पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले. सुरेश सावंत म्हणाले, सैराट हा सिनेमा दलित व बहुजनांचा आहे. मात्र तो ‘फँड्री’एवढा सरस नाही. आज अनेक चळवळीतले कार्यकर्ते विवाह करताना जात पाहतात, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. तर लता प्र. म. यांनी सैराटची दृष्टी स्त्रीवादी असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)>मनीषा चौधरी यांची मागणी हास्यास्पदभाजपाच्या आमदार मनीषा चौधरी यांनी ‘सैराट’सारख्या सिनेमांमुळे बलात्काराच्या घटना वाढल्या असून, यातील आक्षेपार्ह भागांवर बंदी घालायला हवी, असे विधान केले होते. मात्र मनीषा चौधरी यांचे हे विधान हास्यास्पद आहे, असेही संजय पवार यांनी चर्चासत्रात नमूद केले.