नागपूर : महारोगी तसेच वंचित-उपेक्षितांच्या सर्वांगीण विकासासाठी झटणाऱ्या डॉ. विकास आमटे यांना नागपूर अवॉर्ड फाऊंडेशनच्या वतीने दिला जाणारा नागभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. शहराच्या त्रिशताब्दीनिमित्त विदर्भाच्या विकासासाठी भरघोस कार्य केलेल्या तसेच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर विदर्भाचा लौकिक वाढविलेल्या, समाजकार्यासाठी आयुष्य वेचलेल्या व्यक्तीस दरवर्षी नागभूषण परस्कार देऊन गौरविले जाते. एक लाख रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
विकास आमटे यांना नागभूषण पुरस्कार
By admin | Updated: September 7, 2015 00:54 IST