शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

शेगावात नाफेड केंद्रावर गोंधळ!

By admin | Updated: February 28, 2017 01:46 IST

परजिल्ह्यातील तूर खरेदीस नकार; शेतक-यांनी अडवला रस्ता.

फहीम देशमुख शेगाव, दि. २७- इतर तालुक्यातील शेतकर्‍यांनी शेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल विक्रीसाठी आणू नये, असे आवाहन केल्यानंतर मंगळवारी अकोला जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी शेगावच्या समिती यार्डावर सकाळी गोंधळ घातला. यावेळी यार्डासमोरील राज्य मार्ग काही काळ बंद केल्यानंतर समितीच्यावतीने या शेतकर्‍यांचा माल स्वीकारण्यास सुरुवात करण्यात आली.शासनाकडून तुरीला ५ हजार ५0 रुपये क्विंटल भाव देण्यात येत आहे; मात्र खरेदी केंद्रांवर गर्दी होत असल्याने जेथे लवकर नंबर लागतो. अशा ठिकाणी तूर विक्रीस आणली जात आहे. येथील केंद्रावरही जिल्ह्यासह परिसरातील शेतकर्‍यांनी तूर विक्रीसाठी गर्दी केलेली आहे. बुलडाणा जिल्ह्यासह नजीकच्या अकोला जिल्ह्यातील शेतकर्‍यांनीही या ठिकाणी तूर विक्रीसाठी आणली आहे. नाफेड १५ मार्चपयर्ंत तूर खरेदी करणार आहे; मात्र बाजार समित्यांमध्ये तुरीची आवक वाढल्याने बाजार समित्यांवर ताण वाढलेला आहे. तालुक्यातील शेतकरी वगळता इतर शेतकर्‍यांनी केंद्रावर तूर आणू नये, असा निर्णय घेण्यात आला. केंद्रासमोर ६00 वाहने नाफेड केंद्रावर तूर खरेदीची शासनाने १५ मार्च ही मुदत दिलेली असल्याने शेतकर्‍यांनी केंद्रावर आपली तूर विक्रीसाठी एकाच गर्दी केली आहे. शेगाव बाजार समितीत तुरीची विक्रमी आवक झाल्याने १५ फेब्रुवारीपासून केंद्रावर नवीन आवक बंद केली होती. यानंतर सोमवारपासून खरेदी सुरु करण्याच्या सूचना समितीच्यावतीने देण्यात आल्यानंतर रविवारी रात्रीपासूनच खामगाव रोडवरील स्व.गजाननदादा पाटील मार्केट यार्डासमोर तुरीने भरलेल्या वाहनांच्या रांगा लागल्या. या रांगा अकोट रोडवरील विश्राम भवनापयर्ंत तर बाळापूर रोडवर मुरारका विद्यालयापयर्ंत पोहोचल्या, याशिवाय एमएसईबी चौक ते स्वामी विवेकानंद चौकापयर्ंत रांगा गेल्याने शहरात दुपारपयर्ंत वाहतूक विस्कळीत होण्याच्या घटना घडल्या. यामुळे शहरातील वाहतूक शाखेवर वाहतूक सुरळीत करण्याचा ताण होता.'त्या' कर्मचार्‍यावर कारवाई नाही शेगाव येथील केंद्रावर सध्या बरीच गर्दी झालेली असून, या केंद्रावर शेतकर्‍यांचा नव्हे, तर व्यापार्‍यांचा माल प्राधान्याने मोजला जात आहे. केंद्रावर आलेल्या शेतकर्‍यांनी नाफेड आणि बाजार समितीच्या कर्मचार्‍यांकडून होणारा दुजाभाव पाहून मागील आठवड्यात आवाज उठविला होता. यावेळीही व्यापार्‍यांच्या मालाची खरेदी बंद पाडत शेतकर्‍यांनी कर्मचार्‍यांना धारेवर धरले. यानंतर या प्रकरणात चौकशीअंती खरेदी-विक्री कर्मचार्‍याच्या इशार्‍यावरून सदर प्रकार होत असल्याचे निष्पन्न झाल्यावरून एका कर्मचार्‍यासह बाजार समितीच्या एका हमालाविरुद्ध समितीने नोटिस बजावल्या होत्या; मात्र या दोघांविरोधात अद्यापपयर्ंत कुठलीच कारवाई झाली नसल्याचे समजते. इतर तालुक्यातील शेतकर्‍यांनी या केंद्रावर माल आणू नये, असा निर्णय शासनाचा नव्हे, तर सभापती- उपसभापती यांनी घेतला होता. या निर्णयामुळे शेतकरी संतप्त झाले. हा निर्णय मागे घेत सर्वांचा माल केंद्रावर सध्या स्वीकारल्या जात आहे.- विलास पुंडकर, सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती शेगाव

जागा कमी असल्याने इतर तालुक्यातील शेतकर्‍यांनी आप-आपल्या तालुक्यातील केंद्रावर तूर विक्रीसाठी न्यावी, असा निर्णय शेगाव तालुक्यातील शेतकर्‍यांच्या हितासाठी घेण्यात आला होता. आता नाइलाजास्तव माटरगाव केंद्रावर बाहेरील शेतकर्‍यांना पाठवावे लागणार आहे.- गोविंद मिरगे, सभापती, बाजार समिती शेगाव