शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

नायजेरियन नागरिकांची पोलिसांना धक्काबुक्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 03:30 IST

अमली पदार्थ विक्री करणा-या नायजेरियन नागरिकांनी नालासोपारा पोलिसांना धक्काबुक्की केल्याची घटना घडली आहे. ‘इंडियन पुलीस हमारा कुछ नही बिगाड सकती’ अशी दर्पोक्ती करणा-या तिघा नायजेरियन नागरिकांना पोलिसांनी अटक

वसई : अमली पदार्थ विक्री करणा-या नायजेरियन नागरिकांनी नालासोपारा पोलिसांना धक्काबुक्की केल्याची घटना घडली आहे. ‘इंडियन पुलीस हमारा कुछ नही बिगाड सकती’ अशी दर्पोक्ती करणाºया तिघा नायजेरियन नागरिकांना पोलिसांनी अटक केली आहे.सदर तक्रार आल्यानंतर पोलीस उपअधीक्षक दत्ता तोटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भारत जाधव, साहाय्यक पोलीस निरीक्षक शिवराम तुगावे, प्रताप दराडे, मधुकर अवतार, विलास पवार यांचे एक पथक तयार करून या परिसरात कोम्बिंग आॅपरेशन करण्यात आले होते.३२ नंबर बिल्डिंगमध्ये नायजेरियन संशयित इसम राहत असल्याची माहिती मिळाल्यावर पोलीस पथक तेथे पोहोचले. तोटेवाड यांनी पासपोर्ट आणि व्हिसासह कागदपत्रांची मागणी केली. त्या वेळी सात ते आठ नायजेरियन त्यांच्यावर धावून गेले. तोटेवाड आणि मधुकर अवतार यांना त्यांनी धक्काबुक्की केली. तुम इंडियन पुलीस हमारा क्या बिगाड सकते हो, अशी दर्पोक्ती करीत नायजेरियन नागरिकांनी पोलिसांना धक्काबुक्की करून पळ काढण्यास सुुरुवात केली.या वेळी पोलिसांनी ओकेगु किंग्सती (३६), माचू अबुम आगार (३५) आणि टिमोथी ओमुजी (३२) यांना अटक केली. तर पाच जण पळून जाण्यात यशस्वी ठरले. तपासात सदर परदेशी नागरिक बेकायदेशीरपणे वास्तव्यास असल्याचे उजेडात आले आहे. पळालेल्या नागरिकांची नावे आरोपी सांगत नसल्याने तपास रेंगाळला आहे. नालासोपारा परिसरात शेकडो नायजेरियन नागरिक बेकायदेशीरपणे वास्तव्य करून राहिलेले असल्याचे याआधीच उजेडात आले होते. असे असतानाही नालासोपाराहून मुंबईकडे जाणाºया लोकल गाड्यांमधून खुलेआम फिरणाºया नायजेरियन लोकांवर कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येते. यातील बहुतांशी नागरिक अमली पदार्थांची तस्करी करीत असल्याचेही लपून राहिलेले नाही. चार महिन्यांपूर्वी येथे नायजेरियन नागरिकाची हत्याही करण्यात आली होती.