शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

एन वॉर्डमध्ये रंगणार अटीतटीची लढत

By admin | Updated: January 31, 2017 15:25 IST

प्रभाग बदलले, सीमा बदलल्या, आरक्षण बदलले त्यामुळे नेतेमंडळींना नव्याने सुरुवात करावी लागत असल्याचे चित्र एन वॉर्डमध्ये पहावयास मिळते आहे.

टीम लोकमत : प्रभाग बदलले, सीमा बदलल्या, आरक्षण बदलले त्यामुळे नेतेमंडळींना नव्याने सुरुवात करावी लागत असल्याचे चित्र एन वॉर्डमध्ये पहावयास मिळते आहे. त्यात मेट्रोमुळे पश्चिम उपनगरला जोडल्या गेलेल्या या परिसरात विकासकाचा मुद्दा उमेदवारांच्या अजेंडावर असणार आहे. यावरच भाजपचे उमेदवार अन्य पक्षांना तोंड देत जोमाने तयारीला लागलेले दिसून येत आहे.

विक्रोळीत ज्या ठिकाणी एस वॉर्डची सीमा संपते तेथून एन वॉर्ड हा घाटकोपर पूर्वेकडून पश्चिमेकडे जातो. यामध्ये विक्रोळी पार्क साईट, अमृतनगर, भटवाडी सारखे डोंगराळ परिसर आहेत. त्यामुळे या ठिकाणी पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे. तर घाटकोपर पूर्वेकडील रमाबाई नगर परिसरात सध्या विकासाचे वारे वाहत आहे. एन वॉर्डमध्ये गुजराती तसेच मराठी भाषिक पट्टा आहे. एन वॉर्डमध्ये पूर्वी १२ प्रभाग होते. मात्र त्यातून एक प्रभाग कमी होत ते ११ प्रभाग झाले आहेत. त्यातील सहा प्रभाग हे महिलांसाठी आरक्षित आहेत. तर उर्वरीत प्रभागांपैकी ४ खुले तर १ इतर मागासवर्गीयांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. त्यामुळे प्रभागांबरोबरच सीमा आणि आरक्षण बदलल्याने या ठिकाणी उमेदवारांची पायपीट वाढलेली दिसून येते.

एन वॉर्ड प्रभाग समिती अध्यक्ष हारुन खान यांचा प्रभाग महिलांसाठी राखीव झाल्याने सध्या त्यांची पत्नी बॅनरवर झळकताना दिसते आहे. तसेच याभागात भाजपचे दोन आमदार आहे. त्यामुळे यावर भाजपची पक्कड बसविण्यासाठी त्यांनी जोमाने तयारी केलेली दिसून येते. तसेच अन्य पक्षाचे उमेदवारही विविध उपक्रमांतून मतदारांना आपलेसे करताना दिसत आहे.

मुळात घाटकोपरमध्ये मेट्रो पश्चिम उपनगरांना जोडली गेल्याने या ठिकाणी कॉर्पोरेट सेक्टर वाढत आहे. तसेच या भागात व्यापारी संकुलही अधिक आहेत. त्यामुळे विकासकामांसाठी उमेदवारांना कसरत करावी लागणार आहे. मात्र डोंगराळ परिसरातील पाण्याचा प्रश्न तसेच एलबीएसचा चिंचोळा भागामुळे होत असलेली कोंडी सारख्या मुलभूत प्रश्न देखील सोडविण्यात येथील नेत्यांना यश आलेले नाही. त्यामुळे मुलुभूत प्रश्न सोडविताना नाकीनऊ आलेले उमेदवार कशा पद्धतीने मतदारांची मते जिंकणार हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे. ........................................‘एन’ वॉर्ड१२३ ते १३३प्रभाग क्रमांक - १२३आरक्षणखुला (महिला)लोकसंख्या एकूण- ५३,५३३अनुसूचित जाती - ६,३३९अनुसूचित जमाती -५९८ व्याप्ती - हनुमाननगर, विक्रोळी पार्क साईट........................प्रभाग क्रमांक - १२४आरक्षणखुला (महिला)लोकसंख्या -एकूण- ५६२०८अनुसूचित जाती - ४७४३अनुसूचित जमाती - ८९३व्याप्ती - वर्षानगर, पार्क साईट कॉलनी, फिरोजशहा गोदरेज कंपनी, सिटी मॉल....................प्रभाग क्रमांक - १२५आरक्षणखुला (महिला)लोकसंख्या - एकूण- ५७९१५अनुसूचित जाती - ७७३५अनुसूचित जमाती - ९८७व्याप्ती - रमाबाई कॉलनी, गोदरेज कंपनी, संभाजी पार्क, गोदरेज कॉलनी, व्रिकोळी व्हिलेज .....................प्रभाग क्रमांक - १२६आरक्षणइतर मागासवर्ग (महिला) लोकसंख्या - एकूण- ५७९९०अनुसूचित जाती - ३२८१अनुसूचित जमाती - ६५३व्याप्ती -जगडुशानगर, इंदिरानगर, साईनाथनगर, नित्यानंदनगर, दामोदर पार्क, नाबार्ड कॉलनी......................प्रभाग क्रमांक - १२७आरक्षणखुलालोकसंख्या - एकूण- ५२५२१अनुसूचित जाती - ३७९७अनुसूचित जमाती - ७३९व्याप्ती - रामनगर, भीमनगर, सिद्धार्थनगर, काजरोळकर सोसायटी......................प्रभाग क्रमांक- १२८आरक्षणखुला (महिला)लोकसंख्याएकूण-५३८६६अनुसूचित जाती -२३८८अनुसूचित जमाती -५३२व्याप्ती - बर्वेनगर, काजुपाडा, गांधीनगर, न्यू दयासागर, मानेकलाल इस्टेट................प्रभाग क्रमांक - १२९आरक्षणइतर मागासवर्गलोकसंख्या एकूण- ५५६४०अनुसूचित जाती - २४५४अनुसूचित जमाती - २८६व्याप्ती - चिराग नगर, आझादनगर, मानेकलाल इस्टेट(‘एन’ व ‘एस’ विभगाची सामईक सीमा व विक्रोळी पार्कसाईट........................प्रभाग क्रमांक - १३०आरक्षणखुला (महिला)लोकसंख्या -एकूण- ५३९४७अनुसूचित जाती - ३४९६अनुसूचित जमाती - ४४२व्याप्ती - किरोल व्हिलेज, टी.पी.एस. कॉलनी, नेव्हल स्टोअर्स, कपोल वाडी....................प्रभाग क्रमांक - १३१आरक्षणखुलालोकसंख्या - एकूण- ६१८८२अनुसूचित जाती - ३३८६अनुसूचित जमाती - ७०३ व्याप्ती - नायडु कॉलनी, म्हाडा कॉलनी, साईबाबानगर, सावित्रीबाई फुलेनगर .....................प्रभाग क्रमांक - १३२आरक्षणखुलालोकसंख्या - एकूण- ६२९९२अनुसूचित जाती - ४००३ अनुसूचित जमाती - ५१० व्याप्ती - सोमया कॉलजे, ओ.एन. जी. सी. कॉलनी, गरोडीयानगर, राजावडी रुग्णालय......................प्रभाग क्रमांक - १३३आरक्षणखुलालोकसंख्या - एकूण- ५९९५०अनुसूचित जाती -९९३३ अनुसूचित जमाती - ५१८व्याप्ती - कामराजनगर, रमाबाई आंबेडकर नगर-----------------------------------------