शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

‘किल्ली’ने उघडले आत्महत्येचे गूढ

By admin | Updated: January 2, 2017 02:24 IST

आॅफिसमध्ये झालेल्या वादावादीमधून एकाने रेल्वे रुळावर झोपून रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. ४ आॅगस्ट रोजी शिवाजीनगर ते खडकी रेल्वे स्थानकांदरम्यान

पुणे : आॅफिसमध्ये झालेल्या वादावादीमधून एकाने रेल्वे रुळावर झोपून रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. ४ आॅगस्ट रोजी शिवाजीनगर ते खडकी रेल्वे स्थानकांदरम्यान घडलेली ही घटना दुचाकीच्या किल्लीमुळे उघडकीस आणण्यात लोहमार्ग पोलिसांना यश आले. परंतु गेल्या चार महिन्यांपासून बेपत्ता झालेल्या मुलाचा शोध घेत असलेल्या वडिलांना मात्र धक्का बसला आहे. अनिल ज्ञानदेव अवचर (वय २२) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी तुषार जोरी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्ञानेश्वर अवचर (वय ४५, रा. मलठण, ता. दौंड) यांनी फिर्याद दिली आहे. अनिल हा शरद कृषी कंपनीमध्ये सहायक म्हणून काम करीत होता. तर जोरी हा समन्वय अधिकारी म्हणून काम करतो. अनिल आणि तुषारमध्ये मासिके बांधण्याच्या कारणावरून वाद झाला झाला. वरिष्ठ निरीक्षक संजय सातव यांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ आॅगस्ट रोजी अनिलचा मृतदेह शिवाजीनगर ते खडकी रेल्वे स्थानकादरम्यान आढळून आला होता. रेल्वेखाली आल्याने त्याच्या मृतदेहाचे दोन तुकडे झालेले होते. त्या वेळी त्याची ओळख पटलेली नव्हती. पोलिसांनी अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल केला होता. त्याच्या अंगावरील पॅँटमध्ये पोलिसांना कोणतीही कागदपत्रे अथवा वस्तू आढळून आलेल्या नव्हत्या. परंतु एक चावीचा जुडगा मिळून आला होता.याच कालावधीत अनिल घरी न परतल्याने त्याच्या कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली होती. तो कामावर जात नसल्याने कोणालाच काही सांगता येत नव्हते. शोध घेता घेता त्याचे नातेवाईक लोहमार्ग पोलिसांकडे गेले. त्या वेळी पोलिसांनी रजिस्टरमधील नोंदी त्याच्या वडिलांना दाखवल्या. अनिलच्या वयाशी मिळत्याजुळत्या एका तरुणाचा मृतदेह मिळाल्याच्या नोंदी रजिस्टरमध्ये होत्या. या नोंदीवरून त्याच्याकडे मिळालेल्या चाव्या घेऊन पोलिसांनी नातेवाईकांसह शरद कृषी कंपनीजवळ जाऊन पाहणी केली. तेथे बेवारस अवस्थेत पडलेल्या दुचाकीला ही चावी लावून पाहिली असता दुचाकीला चावी लागली. त्यानंतर नातेवाईकांनी पोलिसांना अनिल काम करीत असलेल्या कंपनीबाबत सांगितले. हा मृतदेह अनिलचाच असल्याची खात्री जवळपास पटली होती. पोलिसांनी कंपनीमध्ये जाऊन अनिल वापरत असलेल्या कपाटाला त्या जुडग्यातील चावी लावून पाहिली. त्या चावीने कपाट उघडल्यानंतर मात्र तो मृतदेह अनिलचाच असल्याचे निष्पन्न झाले. लोहमार्ग पोलिसांनी तत्काळ कंपनीतील कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली. त्या वेळी दोन साक्षीदार महिलांनी घटनेच्या दिवशी अनिलची आणि जोरीची भांडणे झाल्याचा जबाब पोलिसांना दिला आहे. जोरीकडेही याबाबत चौकशी करण्यात आली आहे. या प्रकरणात एकूण आठ जबाब नोंदवण्यात आले आहेत. अनिलच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्याप्रकरणी जोरीविरुद्ध गुन्हा दाखल करून हा गुन्हा शिवाजीनगर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.