शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मायलेकीचा जळून मृत्यू

By admin | Updated: July 12, 2014 01:55 IST

बाळापूर येथील मोमीनपुरा भागातील एक विवाहिता व तिच्या दीड वर्षीय मुलीचा संशयास्पदरित्या जळून मृत्यू.

बाळापूर : येथील कासारखेड छोटा मोमीनपुरा भागातील एक विवाहिता व तिच्या दीड वर्षीय मुलीचा संशयास्पदरित्या जळून मृत्यू झाल्याने खळबळ माजली आहे. ही घटना गुरुवार, १0 जुलैच्या रात्री उशीरा घडली. बाळापूर पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची न नोंद केली आहे. पोलिस सुत्रांनूसार, छोटा मोमीनपुरा भागातील शाहेदा बानो मो. जकारीया (२५) व तिची मुलगी आमेना मो. जकारीया (दिड वर्ष)यांचा राहत्या घरात रात्री ११.३0 ते १२ वाजताचे दरम्यान जळून मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी नोंद घेतली असून तपास सुरू केल आहे. दरम्यान, सासरच्या मंडळींनी आपली मुलगी व नातीची गळा दाबून हत्या केल्यानंतर जाळून टाकल्याचा आरोप केला आहे. त्यानूसार पोलिसांनी मृतक महिलेचा पती, सासरा, सासू यांना ताब्यात घेतले आहे. शवविच्छेदन अहवालानंतर संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. मृतक महिलेच्या माहेरकडील मंडळींच्या आरोपांनुसार, अकोला येथील फिरदोस कॉलनीतील रहीवासी तथा डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात लिपिक पदावर कार्यरतर असलेल्या अब्दुल सत्तार यांची मुलगी शाहेदा बानो(२५) हिचा विवाह बाळापूर येथील मोहम्मद जकारीया मोहम्मद जाफर याच्यासोबत १८ मे २00९ रोजी झाला होता. विवाहाच्या दोन वर्षांनंतर त्यांना आमेना नावाची मुलगी झाली. दरम्यानच्या काळात सासरच्या मंडळींनी शाहेदाकडे माहेरून एक लाख रुपये आणण्याचा तगादा लावला होता. या कारणावरून तिचा शारीरिक व मानसिक छळही सुरू होता. दरम्यान गुरुवारी रात्री शाहेदा व मुलगी आमेना यांचा मृत्यू झाला. शाहेदाच्या सासरच्या मंडळींनी आधी दोघांची गळा दाबून हत्या केली व नंतर त्यांना रॉकेल टाकून पेटवून दिले, असा आरोप शाहेदाचे वडील अब्दुल सत्तार यांनी केला आहे. अब्दुल सत्तार हे याबाबतची लेखी तक्रार पोलिसांत करणार आहेत. याबाबत बाळापूरचे ठाणेदार सुनील सोळंके यांच्याशी संपर्क साधला असता यांनी सांगितले की, या प्रकरणाचा तपास सुरू असून, मृतकांच्या शवविच्छेदन अहवालानंतरच पुढील कारवाई केली जाणार आहे.