शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

‘माझ्या मित्राच्या बॅगेत बॉम्ब आहे...’

By admin | Updated: March 5, 2017 02:09 IST

‘माझ्या मित्राच्या बॅगेत बॉम्ब आहे, त्याची नीट झडती घ्या...’ अशी मस्करी दिल्लीला जाण्यासाठी निघालेल्या एका मॉडेलने विमानतळावर केली. मात्र, ही मस्करी तिला

मुंबई : ‘माझ्या मित्राच्या बॅगेत बॉम्ब आहे, त्याची नीट झडती घ्या...’ अशी मस्करी दिल्लीला जाण्यासाठी निघालेल्या एका मॉडेलने विमानतळावर केली. मात्र, ही मस्करी तिला चांगलीच महागात पडली. गुरुवारी घडलेल्या या घटनेमुळे विमानतळावर तासभर तणावाचे वातावरण होते. या प्रकरणी सहार पोलिसांनी तिला अटक केली आहे. गुरुवारी रात्री ठाकूर ८च्या सुमारास एअर इंडियाच्या विमानाने दिल्लीला निघाली होती. त्या वेळी तिच्यासोबत तिचे मित्र होते. साहित्याची तपासणी करताना मित्राच्या बॅगेचीही नीट झडती घ्या, असे तिने सुरक्षारक्षकांना सांगितले. सुरुवातीला त्यांनी तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, ती वारंवार मित्राची बॅग तपासण्याची विनंती करू लागली. त्यांच्या बागेत बॉम्ब असल्याचे तिने तेथील सुरक्षारक्षकांना सांगितले, तेव्हा केंद्रीय औद्योगिक बलाच्या जवानांना त्या ठिकाणी पाचारण करण्यात आले. पोलिसांकडून शोधमोहीम सुरू झाली. मात्र, वातावरणातही तणाव निर्माण झाला होता. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच, जवळपास तासभराने ‘मी मस्करी करत होते,’ असे ठाकूरने अधिकाऱ्यांना सांगितले. सर्वांनीच सुटेकचा निश्वास सोडला. मात्र, या प्रकारामुळे तपास यंत्रणेची दमछाक झाली. त्यांनी याची माहिती सहार पोलिसांना दिली. पोलिसांनी ठाकुरवर गुन्हा दाखल करत तिला अटक केली. त्यानंतर, जामिनावर तिची मुक्तता करण्यात आली. (प्रतिनिधी)घटनाक्रमगुरुवारी रात्री ८ वाजता : कांचन ठाकूर मित्रांसोबत विमानतळावरील बोर्डिंग गेटवर दाखल.रात्री ८.३० : तेथील सुरक्षा रक्षकांना मित्रांच्या बॅगेत बॉम्ब असल्याची माहिती दिली.रात्री १० : या घटनेमुळे दिल्ली येथे जाणारे एअर इंडियाच्या विमानाच्या उड्डाणास एक तास उशीर झाला. शुक्रवारी पहाटे १ : सीआयएफएस यांनी बॅगेची झडती घेतली, तेव्हा त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. पहाटे १.३० : ठाकुर आणि तिच्या मित्रांना सहार पोलीस ठाण्यात नेण्यात आले.पहाटे ४.३० : ठाकुरविररुद्ध गुन्हा दाखल. मात्र, या वेळी सूर्योदयाआधी तिला अटक करणे शक्य नसल्याने तिला सकाळी हजर होण्यास सांगितले. सकाळी १० : ठाकुर मित्रांसोबत पोलीस ठाण्यात मित्रांसोबत हजर झाली.सकाळी १०.३० : ठाकुरला अटक केली आणि जामिनावर सुटका.