शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
3
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
4
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
5
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
6
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
7
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
8
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
9
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
10
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
11
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
12
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
13
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
14
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
15
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
16
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

‘मंगेश पाडगावकरांमुळेच माझे अस्तित्व’!

By admin | Updated: December 31, 2015 04:16 IST

अरुण दाते हे अस्तित्वच मुळी मंगेश पाडगावकरांमुळे आहे. गायक म्हणून मी माझी ओळख त्यांना समर्पित करतो. पाडगावकर आपल्यात नाहीत, यावर अजूनही विश्वास ठेवणे अत्यंत कठीण आहे.

- अरुण दाते

अरुण दाते हे अस्तित्वच मुळी मंगेश पाडगावकरांमुळे आहे. गायक म्हणून मी माझी ओळख त्यांना समर्पित करतो. पाडगावकर आपल्यात नाहीत, यावर अजूनही विश्वास ठेवणे अत्यंत कठीण आहे. या क्षणाला मनात कोलाहल सुरू आहे, बुद्धी आणि मन एकमेकांशी भांडत. ‘गुरू’..‘वडील’..आणि जगायला शिकवणारं ‘विद्यापीठ’ या सर्व संज्ञांच्या पलीकडे आमचं नातं होतं. पाडगावकरांनी मला घडवलंय, त्यांच्याशिवाय पाऊल पुढे टाकणं हा विचारही मन हेलावून टाकणारा आहे. संगीत क्षेत्रातील कारकिर्दीत पाडगावकर कायम माझ्यासोबत सावलीसारखे राहिले, त्यासाठी मी कृतज्ञ आहे. ‘शुक्रतारा... मंदवारा’ हे पाडगावकरांसोबत केलेलं पहिल गाणं. पाडगावकरांच्या शब्दांविषयी मी बोलणं उचित ठरणार नाही. मात्र, ही गाणी इतकी प्रसिद्ध होण्यामागे मंगेश पाडगावकरांची कविता हे मूळ कारण आहे. पाडगावकरांच्या शब्दसामर्थ्यामुळे गाण्यांना जिवंतपणा आला. त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव हा शब्दांमध्ये व्यक्त करता येणार नाही आणि त्यांच्यासारखा कवी साहित्य क्षेत्रात पुन्हा कधीच होणे नाही, हेही तितकेच खरे आहे. ‘या जन्मावर...या जगण्यावर’ हे गाणं करतानाचा एक वेगळाच अनुभव आहे. एका रात्री उशिरा पाडगावकरांचा फोन आला आणि एक कविता ऐकवायची आहे, असे म्हणून पाडगावकरांनी ‘या जन्मावर...या जगण्यावर शतदा प्रेम करावे’ ही संपूर्ण कविता फोनवर ऐकविली. यशवंत देव यांनाही कविता ऐकवलीये, असे म्हणून कवितेला चाल लावं, असे त्यांनी सांगितले आणि रात्री उशिरा फोन केल्याबद्दल ते म्हणाले होते की, ‘पानावरची शाई वाळण्याआधी कविता ऐकवायची’ होती, म्हणून आवर्जून फोन केला. मी पाडगावकरांसोबत ६०-७० कार्यक्रम एकत्र केले, पण पाडगावकरांच्या शब्दसामर्थ्यामुळेच हे कार्यक्रम रसिकांच्या मनावर आजही अधिराज्य गाजवित आहेत. यशवंत देव आणि पाडगावकरांची यांची भेट दसऱ्याच्या दिवशी झाली होती. त्या दिवशी मनमोकळेपणाने त्यांच्याशी गप्पा मारल्या आणि त्यांचा आशीर्वाद घेतला होता. आता या क्षणीही ते ‘होते’ असे म्हणायला मन धजावत नाहीये, अजूनही विश्वास बसत नाहीये. (शब्दांकन : स्नेहा मोरे)