शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

मुस्तफा डोसाचा मृत्यू

By admin | Updated: June 29, 2017 02:03 IST

१९९३ मुंबई साखळी बॉम्बस्फोटांप्रकरणी दोषी ठरवलेल्या मुस्तफा डोसा याचा बुधवारी जे.जे. रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : १९९३ मुंबई साखळी बॉम्बस्फोटांप्रकरणी दोषी ठरवलेल्या मुस्तफा डोसा याचा बुधवारी जे.जे. रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्याला उच्च रक्तदाब व मधुमेहाचा होता.विशेष टाडा न्यायालयाने १६ जून रोजी त्याला १९९३ साखळी बॉम्बस्फोटांप्रकरणी दोषी ठरवले होते. न्यायालयाने दोषी ठरवल्याबद्दल डोसाला धक्का बसला होता. त्याच्या चेहऱ्यावरचा तणाव स्पष्ट दिसत होता. या निर्णयानंतर त्याची तब्येत खालावत गेली. त्यामुळे न्यायालयाने त्याला रुग्णालयात दाखल होण्यास सांगितले. मात्र डोसाने स्पष्ट नकार दिला. ‘मरायचंच आहे तर रुग्णालयात दाखल का होऊ?’ असे त्याने न्यायालयाला सांगितले.डोसाची तब्येत बिघडल्याने मंगळवारी मध्यरात्री १च्या सुमारास त्याला जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे तीन तासांच्या उपचारानंतर त्याला आर्थर रोड कारागृहात पाठवले. पण काही काळाने त्याला ताप आला व छातीतही दुखू लागले. सकाळी पुन्हा त्याला जे.जे. रुग्णालयात दाखल केले. या वेळी उपचारादरम्यान हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुपारी २.३०च्या सुमारास डोसाचा मृत्यू झाला, अशी माहिती जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांनी दिली.१९९३ बॉम्बस्फोटांतील डोसाची भूमिका-मुंबईमध्ये १२ मार्च १९९३ रोजी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांत २५७ जणांचा मृत्यू झाला तर ७००हून अधिक लोक गंभीररीत्या जखमी झाले. सलीम शेख उर्फ सलीम कुत्ता याने १९९५ साली दिलेल्या जबाबावरून मुस्तफा डोसाला या स्फोटाचा आरोपी करण्यात आले. त्याला दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावरून २० मार्च २००३ रोजी अटक करण्यात आली. मात्र डोसाने आपण निर्दोष असून ते सिद्ध करण्यासाठी स्वत:हून पोलिसांना शरण आल्याचा दावा न्यायालयापुढे केला होता.