शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
3
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
4
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
5
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
6
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
7
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
8
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
9
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान
10
विशेष लेख: उपराष्ट्रपतिपदाच्या खुर्चीत 'खेळात न उतरणारा खेळाडू'
11
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
12
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?
13
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
14
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
15
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
16
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
17
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
18
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
19
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
20
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...

मुस्लिमांना कळले इसिसचे खरे स्वरूप

By admin | Updated: February 7, 2016 01:22 IST

तरुणांची डोकी भडकवून त्यांना वाममार्गाला लावणारे इसिसचे दहशतवादी नंतर त्यांची फसवणूक करीत असल्याचे मुस्लिम बांधवांच्या लक्षात आले असून, त्यांनाही इसिस ही संघटना

नागपूर : तरुणांची डोकी भडकवून त्यांना वाममार्गाला लावणारे इसिसचे दहशतवादी नंतर त्यांची फसवणूक करीत असल्याचे मुस्लिम बांधवांच्या लक्षात आले असून, त्यांनाही इसिस ही संघटना नको आहे. त्यामुळे आता मुस्लिमबहुल वस्त्यांमधील स्थानिक नेते पुढे येऊन तरुणांचे समुपदेशन करीत आहेत. ही अतिशय आनंदाची बाब आहे, असे मत पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी मांडले.महाराष्ट्रासह देशातील काही मुस्लिम तरूण इसिस या दहशतवादी संघटनेकडे वळत असल्याची गंभीर दखल घेत, हे लोण महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात पसरू नये, यासाठी पोलिसांनी राज्यभर मोहीम सुरू केली आहे. मुंबई आणि औरंगाबाद येथून काही मुस्लिम तरूणांना इसिसचे समर्थक असल्यामुळे अटक झाल्याची दखल घेत मुस्लिम धर्मगुरू, मौलवी तसेच त्या समाजातील विचारवंत यांच्या मदतीने मुस्लिम तरूणांच्या समुपदेशनाचे अभियान सुरू झाले आहे. त्यामुळे मुस्लिम तरूण इसिसकडे वळण्याची शक्यता कमी झाली आहे. पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांचे प्रतिपादन त्याला पुष्टी देणारेच आहे. मुस्लिम तरूणांच्या मनात काय सुरू आहे, हे समजून घेण्याचा प्रयत्न गुप्तचरांमार्फत सुरू असून, संशय आल्यास अशा तरुणांच्या हालचालींवर लगेचच बारीक लक्ष ठेवले जात आहे. (प्रतिनिधी)अनेकांनी घेतला धसकाकेवळ पोलीसच नव्हे, तर एनआयए, आयबी अशा सर्व गुप्तचर व तपास यंत्रणा कामाला लागल्या आहेत, तर दुसरीकडे इसिसमध्ये गेल्याने काहीच साध्य होणार नाही, हे मुस्लिम तरूणांच्या लक्षात आले आहे. शिवाय भारतीय मुस्लिम तरूणांनाही इसिसने ठार केल्याने त्या संघटनेविषयी धसकाच बसला आहे. इसिसचा दहशतवाद हा जिहाद असू शकत नाही, हे बिंबवण्यात पोलिसांपासून मुस्लिमांमधील ज्येष्ठ नेते, मौलवी आणि विचारवंत यांना यश येत आहे.- प्रवीण दीक्षितआतापर्यंत २३ अटकेतआतापर्यंत मुंबईच्या मालाडतसेच माझगाव भागात राहणाऱ्या तिघा इसिस समर्थकांना अटक करण्यात आली असली तरी देशभरात अटक झालेल्यांची संख्या २३ वर गेली आहे. इसिसविषयी कुतुहल असणाऱ्या मुस्लिम तरूणांची संख्या याहून मोठी असण्याची शक्यता असली तरी ते प्रत्यक्षात त्याकडे आकर्षित होताना दिसत नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. शिवाय सायबर सेलमार्फत संशय असलेल्या प्रत्येकावर लक्ष ठेवण्यात येत असल्याने हे तरूण आता सोशल मीडियामार्फतही इसिसची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करण्याच्या फंदातपडायला तयार नाहीत, असे या अधिकाऱ्याने सांगितले.