शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

मुस्लिमांचा आंदोलनाचा इशारा

By admin | Updated: November 5, 2016 03:35 IST

देशात हिंदू कोड बिलही आहे आणि मुस्लिम पर्सनल लॉ आहे. तो तो समाज त्याचे पालन करतो.

कल्याण : देशात हिंदू कोड बिलही आहे आणि मुस्लिम पर्सनल लॉ आहे. तो तो समाज त्याचे पालन करतो. आता मुस्लिम पर्सनल लॉ बदलण्याचा घाट घातला जात आहे. हा कायदा बदलून मुस्लिमांवर समान नागरी कायदा लादला जात आहे. तलाक ही मुस्लिमांची एकमेव समस्या असल्याचे भासविले जात आहे. जर मुस्लिम पर्सनल लॉमध्ये हस्तक्षेपाचा प्रय्तन मोदी सरकारने केला, तर त्याविरोधात आंदोलन छेडले जाईल, असा इशारा समाजातर्फे देण्यात आला. त्याविरोधात स्वाक्षरी मोहीम व कायदेशीर लढा दिला जाईल, असेही समाजातील जाणकारांनी स्पष्ट केले. पश्चिमेतील इलाही बक्श मैदानात गुरुवारी सायंकाळी मजलिसे मुशावरीन मस्जीदे औकाफ यांच्या पुढाकाराने समान नागरी कायदा आणि तलाकपद्धती बंद करण्याच्या सरकारच्या हालचालीच्या विरोधात सभा झाली. याप्रसंगी अध्यक्ष मौलाना अस्मत बुबेरे, हसीममुल्ला कासमी, अब्दुस सलाम, अब्दुल कवी, मुफ्ता हाफिज, फुरकान मुक्री, मुफ्ती सैफ, शरफुद्दीन कर्ते, मोईन डोन, अ‍ॅड. फैसल काजी, प्रा. मोनिसा बुशरा आणि नगरसेवक काशीफ तानकी आदी मान्यवर उपस्थित होते. अ‍ॅड. काजी यांनी सांगितले की, मुस्लिम धर्मात ज्या गोष्टी व्यर्ज्य सांगितल्या आहेत. त्यात तलाक ही परमेश्वराला नापसंत असलेली गोष्ट आहे. पत्नी-पत्नी यांच्यात समझोता न झाल्यास तलाक दिला जातो. उठसूट कोणी तलाक घेत नाही. इतर धर्मात एखादी महिला घटस्फोटासाठी न्यायालयाच्या चकरा मारते. तिला प्रसंगी १०-१२ वर्षांनी न्याय मिळतो. त्यापेक्षा मुस्लिम पर्सनल लॉ मधील तलाक पद्धतीने ती लवकर मुक्त होते. तलाकविषयी अपप्रचार केला जात आहे. सर्वोच्च न्यायालयानेच मत व्यक्त केले आहे की, देशात समान नागरी कायदा लागू होण्यास जोपर्यंत पोषक वातावरण तयार होत नाही. तोपर्यंत तो लागू करता येणार नाही. केंद्राला त्याची आताच का घाई झाली आहे, असा सवालही त्यांनी केला.प्रा. बुशरा यांनी सांगितले की, मोदी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते. तेव्हा गुजरातमध्ये मुस्लिम महिलांवर बलात्काराच्या घटना झाल्या. तेव्हा त्यांना मुस्लिम महिलांची बाजू घ्यावीशी का वाटली नाही, तेव्हा त्यांनी न्याय का दिला नाही? आता ते पंतप्रधान झाले आहेत. भाजपा सरकारने मुस्लिमांच्या तलाक प्रश्नात हस्तक्षेप करू नये. आहे तोच कायदा चांगला आहे.अध्यक्ष बुबेरे यांनी सांगितले, उपयुक्त नसलेला कायदा लादला जात असेल तर तो नाकारण्याचा अधिकार मुस्लिमांना आहे. समान नागरी कायदा आणि तलाक पद्धती बंद करण्याच्या विरोधात स्वाक्षरी मोहीम सुरू आहे. ती अधिक गतिमान केली जाईल. तसेच कायदेशीर लढाईही लढण्यासाठी समाज सज्ज आहे. शरफुद्दीन कर्ते यांनी, टिव्हीवर चमकणाऱ्या महिलांना हाताशी धरून तलाकविषयी अपप्रचार केला जात आहे. हा अपप्रचार मुस्लिम धर्माचे पालन करणाऱ्या महिला मोडीत काढतील, असे त्यांनी सांगितले. >तलाकचे प्रमाण नगण्य : मुस्लिम समाजाच्या अन्यही अनेक समस्या आहेत. मात्र तलाक हीच एकमेव समस्या आहे, असे भासविले जात आहे. प्रत्यक्षात मुस्लिम समाजात तलाकचे प्रमाण हे ०.५३ इतके नगण्य आहे. तरीही हाच प्रश्न मुस्लिमांचा प्रमुख प्रश्न आहे, असे भासवून त्यांच्यावर समान नागरी कायदा लादला जात आहे, अशी भूमिका अन्य मौलवी व पदाधिकाऱ्यांनी व्यासपीठावर मांडली.