शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई आणि उपनगरांमध्ये मुसळधार

By admin | Updated: June 25, 2017 11:16 IST

गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेणाऱ्या पावसाने आज मुंबई आणि उपनगरांमध्ये जोरदार पुनरागमन केले. मुंबई आणि उपनगरांसह ठाणे, कल्याण, डोंबिवली

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 25 - गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेणाऱ्या पावसाने आज मुंबई आणि उपनगरांमध्ये जोरदार पुनरागमन केले. मुंबई आणि उपनगरांसह ठाणे, कल्याण, डोंबिवली, भाईंदर, वसई-विरार, पालघर आदी भागांमध्येही विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडत आहे.रात्रभर पडत असलेल्या पावसामुळे  मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले आहे. पहाटेच्या वेळी कळवा स्थानकाजवळ आणि ठाणे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्र. 2, 3 आणि 4 दरम्यान पाणी साठल्याने मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली आहे. त्यामुळे धिम्या मार्गावरून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या आणि येणाऱ्या गाड्या जलद मार्गावर वळवण्यात आल्या होत्या. 
चांगली सुरुवात केल्यानंतर पावसाने ओढ दिल्याने चिंतेेचे वातावरण पसरले होते. दरम्यान, काल सकाळपासून पावसाने मुंबई आणि परिसरात जोरदार हजेरी लावण्यास सुरुवात केली. दरम्यान, रात्री पावसाचा जोर वाढला. मुंबई आणि उपनगरांच्या तुलनेत ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, पालघर आदी भागात पावसाचा जोर अधिक होता.
ठाण्यातील मानपाडा भागात पावसामुळे पालिका कार्यालयाची भिंत कोसळली. त्यात दोन वाहनांचे नुकसान झाले. कळवा आणि ठाण्यामध्ये मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतुकही खोळंबली. कळवा स्थानकात रेल्वे रुळांवर मोठ्या प्रमाणावर पाणी साठल्याने धिम्या मार्गावरील वाहतूक थांबली. त्यामुळे धिम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावरून वळवण्यात आल्या होत्या. परिणामी मध्य रेल्वेच्या काही लोकल अर्धा ते पाऊण तास उशिराने धावत आहेत. काही वेळाने धिम्या मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली. पण लोकलचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले.