शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

अंधत्वावर मात करत झाला संगीत विशारद

By admin | Updated: May 17, 2016 01:36 IST

जीवनातील वैगुण्यावर मात करत, त्यातून हार्मोनियम वादनाची कला अवगत करण्याची जिद्द येथील तरुणाने दाखविली आहे.

पिंपरी : जीवनातील वैगुण्यावर मात करत, त्यातून हार्मोनियम वादनाची कला अवगत करण्याची जिद्द येथील तरुणाने दाखविली आहे. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या विशारद परीक्षेत किरण गिरमे या अंध तरुणाने प्रथम श्रेणी मिळविली. त्यामुळे अंधारातील आयुष्याला उदरनिर्वाहाचा किरण मिळाला आहे. महापालिकेच्या संगीत अकादमीतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. कुटुंबीयांचे प्रोत्साहन व मेहनत यांमुळेच यश संपादन करता आले, असे किरणचे म्हणणे आहे. अजमेरा कॉलनीतील रहिवासी असलेल्या किरण यांना वयाच्या १६ व्या वर्षांपर्यंत सूर्यप्रकाशात दिसू शकेल, इतकी दृष्टी होती. त्यानंतर हळूहळू दृष्टी अधू होत गेली व कायमस्वरूपी अंधत्व प्राप्त झाले. इंदिरा गांधी विद्यालयात जेमतेम दहावीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर अंधत्वामुळे पुढील शिक्षणास प्रवेश मिळण्यासाठी अडचणी आल्या. रेडिओ ऐकण्याच्या सवयीमुळे त्याला संगीताची आवड निर्माण झाली. आवड व उदरनिर्वाहासाठी हार्मोनियम शिकण्याचा निर्णय घेतला. राजीव तांबे या शिक्षकाने स्वत: घरी येऊन शिकवणी घेतली. विशिष्ट भाषा, खाणाखुणांतून शिक्षण सुरू ठेवले. कॉम्प्युटर, मोबाइल सारख्या उपकरणांचा वापर करत शिक्षण सोपे करण्याचा प्रयत्न केला. आई व पत्नी यांनी वाचन व रेकॉर्डिंगमध्ये मदत केली. अभ्यासक्रम सॉफ्टवेअरमधून रेकॉर्ड करून सराव केला. प्राथमिक चार परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर २०११मध्ये संगीत अकादमीत प्रवेश घेतला. तिथे उमेश पुरोहित यांच्या मार्गदर्शनाखाली विशारद प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केले. आता अंधत्वाची भिती न वाटता मी माझा उदरनिर्वाह करीत आहे. मी स्वावलंबी झालो आहे, असे किरणने अभिमानाने सांगितले. (प्रतिनिधी)