शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

म्युझिकल सांता घालतोय ‘जिंगल बेल’ची भुरळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2015 00:31 IST

लहान मुलांना भेटवस्तू देऊन त्यांचे मनोरंजन करणारा सांता नाताळमध्ये ठिकठिकाणी पाहायला मिळतो. तो आता भेटवस्तूमध्ये प्रामुख्याने दिसून येत असून यंदा म्युझिकल सांता

सातारा / वाठार स्टेशन : कोरेगाव तालुक्यातील सोळशी शनिदेवाच्या चौथऱ्यावर जाऊ इच्छिणाऱ्या धाडसी महिलांनी धर्माचा आदर करत आपली इच्छा पूर्ण करावी, तसेच या घटनेला विरोध करणाऱ्या नंदगिरी महाराजांनीही स्त्रित्वाचा आदर करत देवस्थानचे नाव जपावे, असे आवाहन सातारा जिल्ह्यातील अनेक माता-भगिनींनी मंगळवारी केले. शनिशिंगणापूरच्या चौथऱ्यावर एका तरुणीने प्रवेश केल्यापासून महाराष्ट्रातील समाजमन ढवळून निघालेले असतानाच आता जिल्ह्यातील ‘सोळशीचा शनी’ मंदिरातील चौथऱ्यावर प्रवेश करून दर्शन घेण्याचा निर्धार काही महिला संघटनांनी जाहीर केला आहे. महिलांच्या अशा शनी दर्शनाला आपला कडाडून विरोध असल्याचे संबंधित सोळशीच्या नंदगिरी महाराजांनी जाहीर केले आहे. ‘पुराणातही अनेक ठिकाणी शनी देवाचा महिला वर्गाशी संवाद झाल्याचे अनेक दाखले आहेत. यात कुठेही शनी देवाने माझ्यासमोर महिलांनी येऊ नये, असे म्हटले नाही. मात्र, अलीकडच्या काळात माता-भगिनींना या देवापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न काहीजणांनी केला. ती चुकीची परंपरा मोडून काढण्यासाठी जर सातारा जिल्ह्यातील महिला पुढाकार घेत असतील तर तो खचितच जिल्ह्याच्या इतिहासाला साजेसा असाच आहे. मात्र, चौथऱ्यावर जाणाऱ्या महिलांनी धर्मशास्त्राच्या पावित्र्याचा भंग होऊ न देता आपली इच्छा पूर्ण करावी,’ अशा शब्दात सुनीता जाधव, प्रमिला पाटील, शोभा देशपांडे अन् ज्योत्स्ना गुजर यांच्यासह अनेक महिलांनी भावना व्यक्त केल्या आहेत. दरम्यान, ‘राज्यघटनेच्या अधिकारानुसार आमच्या मंदिरात येऊ पाहणाऱ्या महिलांनी इतर धर्मियांच्या प्रार्थनास्थळातही जावे, मग आमच्याकडे यावे,’ असे आवाहन सोळशी येथील शनैश्वर देवस्थानचे मठाधिपती नंदगिरी महाराज यांनी केले आहे. तर या मुद्याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना राज्य महिला आयोग संघटनेच्या राज्याध्यक्षा अ‍ॅड. वर्षा देशपांडे यांनी स्पष्ट केले की, ‘आम्ही ज्या धर्मात जन्मलो, त्याच धर्माच्या मंदिरात जाणार ना? दुसऱ्या धर्माचा संदर्भ देऊन विषय बदलण्याची काहीही गरज नाही.’’नंदगिरी महाराज यांनी शनी दर्शनाबाबत सखोल विवेचन केले आहे. ते म्हणतात की, ‘प्रत्येक धर्माला ग्रंथाचा आधार असतो, त्याप्रमाणे शनी देवतेबाबत ज्योतीषाचार्य वि. के. फडके यांच्या शनि पिडा पुस्तकात शनिदर्शन कसे घ्यावे, याबाबत दाखला देण्यात आला आहे. यामध्ये शनिदर्शनामुळे आपली शनिपिडा निश्चितपणे दूर होईल, अशी खात्री आहे; पण हे दर्शन घेताना महत्त्वाचा नियम हे लोक विसरतात, हा नियम म्हणजे शनिचे दर्शन कधीही समोरून घेऊ नये, त्याच्या डोळ्याला डोळा भिडवायचा नाही, कारण ‘दृष्टी पडे जयावर होइ तयाचा चकनाचूर’ असे शनिमहात्म्यात स्पष्टपणे सांगितले आहे. या प्रकारेच आचार्य रामानंद सरस्वती लिखित शनि उपासना, डॉ. भोजराज द्विवेदी लिखित भोजसाहित्य, डॉ. ना. कृ. घळसासी लिखित श्री शनीकोष अशा ग्रंथामधून शनीच्या दर्शनाबाबत परखड भूमिका मांडण्यात आल्या आहेत.’ (प्रतिनिधी)