शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

लहानग्या कर्करुग्णांसाठी आता ‘म्युझिक थेरपी’

By admin | Updated: June 9, 2017 02:23 IST

कर्करोगग्रस्त लहान मुलांची काळजी घेणारी संस्था सेंट ज्यूड्स चाइल्ड केअर सेंटर आपल्या म्युझिक थेरपी प्रयत्नांना अधिक चालना देणार आहे

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कर्करोगग्रस्त लहान मुलांची काळजी घेणारी संस्था सेंट ज्यूड्स चाइल्ड केअर सेंटर आपल्या म्युझिक थेरपी प्रयत्नांना अधिक चालना देणार आहे. त्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू ब्रेट लीसह सामाजिक संस्थांसोबत जनजागृती उपक्रम सुरू करण्यात आला आहे.यापूर्वी २०११ सालीदेखील ब्रेट लीने ‘म्युझिक’ या आपल्या संस्थेमार्फत एका क्लिनिकल म्युझिक थेरपी प्रोग्रामला मदत केली होती. जवळपास १८ महिने चाललेल्या या उपक्रमात अनेक प्रमाणित आॅस्ट्रेलियन क्लिनिकल म्युझिक थेरेपीस्ट्सनी लहानग्यांना वेदना व्यवस्थापनात मनोधैर्य वाढविण्यात आणि औषधांबरोबरीनेच पूरक उपचार प्रदान करण्यात मदत केली. या वेळी पुन्हा एकदा ब्रेट ली या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीसाठी पुढे सरसावला आहे. कर्करोगग्रस्त मुलांच्या मदतीसाठी म्युझिक थेरपीच्या लाभांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी तो सहकार्य करणार आहे. म्युझिक थेरपी अर्थात संगीताच्या माध्यमातून उपचार पद्धती, त्यातील प्रक्रिया तसेच त्याचे सिद्ध झालेले वैद्यकीय लाभ यांची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी ब्रेट ली मोठ्या प्रमाणावर सहभागी होईल. याविषयी ब्रेट लीने सांगितले की, माझ्या जडणघडणीत संगीताची खूप मोलाची भूमिका राहिली आहे. आज मी जो कोणी आहे त्यात संगीताचा खूप मोठा वाटा आहे. संगीतामुळे जीवनात आमूलाग्र बदल घडून येऊ शकतात. या माझ्या विश्वासाला पुष्टी देणारे बरेच संशोधनदेखील करण्यात आले आहे. संगीताच्या माध्यमातून उपचारांचे सकारात्मक परिणाम लोकांपर्यंत पोहोचवू शकेन याची खात्री आहे.सेंट ज्यूड्स कॉटनग्रीन कॅम्पसमधील क्लिनिकल म्युझिक थेरपिस्ट आस्था लुथ्रा यांनी सांगितले की, संगीतोपचार हे अतिशय मुलायमपणे पण प्रभावीपणे कार्य करतात. कर्करोगांवरील उपचारांमध्ये म्युझिक थेरपी खूप मोलाची भूमिका बजावते. उपचारकाळात शरीरात व मनामध्ये होणारे चढ-उतार सहन करण्याची ताकद या थेरपीमुळे मिळते. या कठीण काळात ही मुले संगीताच्या साथीने अधिक आनंदात राहू शकतात, स्वत:च्या भावभावनांवर नियंत्रण ठेवू शकतात. या उपचारांमुळे लोकांचे आपआपसातले संबंध सुधारतात, विविध उपचारांना सकारात्मक भावनेने सामोरे जाता येते.