शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
12
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
13
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
14
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
15
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
16
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
17
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
18
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
19
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
20
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!

गाण्यांची कमाल अन् नृत्याची धमाल

By admin | Updated: May 3, 2017 01:22 IST

‘मराठी तारका’ कार्यक्रमाला प्रचंड गर्दी : पोलिस कल्याण निधीसाठी आयोजन

कोल्हापूर : दिलखेचक लावण्या, डोलायला लावणारी गाणी, नकलांचा मसाला आणि पोलिसांचे नृत्य यांमुळे पोलिस कल्याण निधीसाठी सोमवारी (दि. १) आयोजित कार्यक्रमाला रसिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. एरवी पोलिसांच्या कवायती पाहणाऱ्या मैदानाने या कार्यक्रमाच्या निमित्ताने टाळ्या आणि शिट्ट्यांचा अनुभव घेतला. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, पोलिस महासंचालक सतीश माथूर आणि विशेष पोलिस महानिरीक्षक यांच्या उपस्थितीमध्ये गणेशवंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी कोल्हापूरच्या स्वराज्य ढोल-ताशा पथकाने कलाकारांना साथ दिली. यानंतर करवीरचे पोलिस निरीक्षक दिलीप जाधव, सहायक पोलिस निरीक्षक वैष्णवी पाटील यांच्या मुलाखतींनी वातावरण हलके झाले. यानंतर हास्यसम्राट दीपक देशपांडे यांनी रंगमंचाचा ताबा घेतला. कलाकारांचे आवाज, जुन्या चित्रपटातील संवादाची पद्धत यांचे हुबेहूब सादरीकरण करीत देशपांडे यांनी टाळ्या वसूल केल्या. यानंतर दादा कोंडके यांच्या गाण्यांवर तेजा देवकर हिने सादर केलेल्या नृत्याला रसिकांची चांगलीच पसंती मिळाली. गायक विश्वजित बोरवणकरने ‘बाजीराव मस्तानी’तील गाण्याला टाळ्या घेतल्या. खास कोलकत्त्याहून आलेल्या आरुणिता या गायिकेने ‘अब की सजन सावन में’,‘चुरा लिया है तुमने जो दिल को’,‘कॉँटा लगा’, ‘मेरे खवाबों में जो आएॅँ’ या गाण्यांवर रसिकांना डोलायला लावले. भार्गवी चिरमुले, हेमांगी कवी यांच्या नृत्यांनाही रसिकांनी दाद दिली. यातील ‘वाजले की बारा’ला तर मंडप टाळ्यांंनी कडकडत होता. हिंदी गाण्यांवर सादर केलेल्या अमृता खानविलकरच्या नृत्यावेळी तर टाळ्यांचा पाऊसच पडला. ‘ए मेरा दिल, प्यार का दिवाना’,‘सारा जमाना, हसिनों का दिवाना’, ‘लैला मैं लैला’ या गाण्यांवर नृत्य करताना अमृताने अशा गाण्यांवरही सफाईदारपणे नाचू शकतो, हे दाखवून दिले. ‘डान्स इंडिया डान्स’मधील विजेते आदिती घोलप, विशाल जाधव यांनी ‘सैराट’मधील गाण्यांवर केलेल्या नृत्याने तर धमाल उडवून दिली. ‘शांताबाई’,‘ वाट बघतोय रिक्षावाला’ गाण्यांवरील नृत्यांना आणि कार्तिकी गायकवाडच्या ‘खंडेरायाच्या लग्नाला’ यासह सादर केलेल्या गाण्यांना रसिकांनी डोक्यावर घेतले. अंबामातेच्या गोंधळाने कार्यक्रमाची सांगता झाली. निवेदक अभिजित खांडकेकर यांनी उत्तम पद्धतीने कार्यक्रम गुंफला. स्मिता शेवाळे, केतकी पालव यांच्या नृत्यांनाही चांगली दाद मिळाली.