शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

मुशीर खानची निर्णायक अष्टपैलू खेळी

By admin | Updated: May 11, 2017 02:37 IST

मुशीर खानच्या जबरदस्त अष्टपैलू खेळाच्या जोरावर मुंबई स्पोर्टिंग युनियन संघाने १६ वर्षांखालील संतोष कुमार घोष चषक

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुशीर खानच्या जबरदस्त अष्टपैलू खेळाच्या जोरावर मुंबई स्पोर्टिंग युनियन संघाने १६ वर्षांखालील संतोष कुमार घोष चषक क्रिकेट स्पर्धेत विजयी कूच करताना मुलुंड जिमखानाला अवघ्या एका विकेटने नमवले. मुलुंडने दिलेल्या १४३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबई स्पोर्टिंग युनियनचीही दमछाक झाली, परंतु मुशीरच्या जोरावर त्यांनी एक गडी राखून बाजी मारली.पारसी सायक्लिस्ट मैदानावर झालेल्या या रोमांचक लढतीत प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुलुंड जिमखानाचा डाव २४.१ षटकात १४२ धावांमध्ये गडगडला. मुशीरने चमकदार हॅट्ट्रीकसह ३४ धावांत ४ बळी घेत मुलुंडच्या फलंदाजीला खिंडार पाडले. विराज पवार (३/४४) आणि ॠतिक चौधरी (२/३२) यांनीही अचूक मारा करताना मुशीरला चांगली साथ दिली. मुलुंडकडून केवळ तेजस देशमुखने २९ धावांची खेळी करून अपयशी झुंज दिली. यानंतर, माफक आव्हानाचा पाठलाग करताना मुंबई स्पोर्टिंग युनियनची फलंदाजीही ढेपाळली. एक वेळ स्पोर्टिंग युनियन पराभवाच्या छायेत आले होते. फलंदाजीत चमकलेल्या तेजसने गोलंदाजीत कमाल करताना ४५ धावांत ४ बळी घेत स्पोर्टिंग युनियनला बॅकफूटवर आणले, परंतु मुशीरने एकाकी किल्ला लढवताना अखेरपर्यंत टिकून राहत नाबाद ९२ धावांचा तडाखा देत, संघाला रोमांचक विजय मिळवून दिला. विशेष म्हणजे मुशीरचा अपवाद वगळता संघातील एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. अन्य लढतीत, सुवर्णलता आचरेकर इलेव्हन संघाने ७ विकेट्सने दणदणीत विजय मिळवताना, सुधांशू स्पोटर््सला सहज नमवले. प्रथम फलंदाजी करणाऱ्या सुधांशू संघाला ३३.४ षटकात १०८ धावांमध्ये गुंडाळले. यानंतर, देव मनसुखानी (४५) आणि आयुष झिम्रे (२९) यांच्याज जोरावर आचरेकर संघाने २० षटकातच ३ फलंदाजांच्या जोरावर ११० धावा काढत दिमाखदार विजय नोंदवला.