शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मुस्लीम आरक्षणावरून गदारोळ  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 03:48 IST

अल्पसंख्यांकांना मुख्य प्रवाहात आणण्याकरिता राज्यातील भाजपा सरकारने कौशल्य विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून केलेले प्रयत्न आणि केंद्र सरकारने अल्पसंख्यांक विकासाचा दुप्पट केलेला निधी, यामुळे पाच वर्षांच्या सत्ता काळानंतर जेव्हा निवडणुका होतील, तेव्हा अल्पसंख्यांक समाज भाजपासोबत असेल, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत केला.

मुंबई : अल्पसंख्यांकांना मुख्य प्रवाहात आणण्याकरिता राज्यातील भाजपा सरकारने कौशल्य विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून केलेले प्रयत्न आणि केंद्र सरकारने अल्पसंख्यांक विकासाचा दुप्पट केलेला निधी, यामुळे पाच वर्षांच्या सत्ता काळानंतर जेव्हा निवडणुका होतील, तेव्हा अल्पसंख्यांक समाज भाजपासोबत असेल, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत केला.एमआयएमचे सदस्य इम्तियाज जलील यांनी मुस्लीम समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांकडून आम्हाला आशा आहे. मात्र, जेव्हा नसीम खान यांच्यासारखे काँग्रेसचे सदस्य जेव्हा या विषयावर बोलतात, तेव्हा गेली १५ वर्षे ते काय करीत होते, असा प्रश्न आम्हाला पडतो. फडणवीस यांनी हाच धागा पकडून काँग्रेसला लक्ष्य केले. मुस्लीम समाज कुणामुळे मागास राहिला, याबद्दल बोलून मला राजकारण करायचे नाही. मात्र, मागच्या सरकारपेक्षा या सरकारने अनेक योजना राबवून अल्पसंख्याकांना मूळ प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही काँग्रेससारखे दुटप्पी नाही. राज्यघटनेनुसार जेवढे आरक्षण देय आहे, तेवढेच देण्याची आमची भूमिका आहे. ज्या राज्यांनी वेळोवेळी आरक्षण वाढविण्याची भूमिका घेतली, ते सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहे. आम्ही मतांच्या राजकारणाकरिता काहीही करीत नसल्याने, निवडणुका होतील, तेव्हा अल्पसंख्यांक आमच्यासोबत असतील, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला.