शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

पांढरेंची आत्महत्या की व्यवस्थेने घडवलेली हत्या?--आॅन दि स्पॉट रिपोर्ट

By admin | Updated: December 12, 2015 00:15 IST

मुलांचे भवितव्य टांगणीला : शेतकऱ्यांच्या आत्महत्येने तासगाव तालुका काळवंडला--

वासुंबे येथील अशोक पांढरे या तरुण शेतकऱ्याने बुधवारी रात्री आत्महत्या केली. गेल्या वर्षभरात तासगाव तालुक्यात सातत्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. त्यामध्ये आणखी एकाची भर. एवढीच काय ती या आत्महत्येची दखल. मात्र पांढरेंनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी पाहिल्यानंतर, ही आत्महत्या की सुस्तावलेल्या व्यवस्थेने घडवून आणलेल खून, असाच प्रश्न उपस्थित होत आहे. त्यांच्या आत्महत्येने उज्ज्वल भविष्याची स्वप्ने पाहणाऱ्या मुलांचे भवितव्यच टांगणीला लागले आहे. तासगावसारख्या सधन तालुक्यात सातत्याने होत असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येंनी तालुका काळवंडला आहे.दत्ता पाटील--तासगावतासगाव शहरापासून अवघ्या काही अंतरावर असणारे वासुंबे गाव. शहरातील वाढते शहरीकरण या गावापर्यंत येऊन पोहोचले आहे. याच गावाचे अशोक पांढरे हे रहिवासी. घरच्या बेताच्या परिस्थितीमुळे दहावीतून अर्धवट शिक्षण सोडले. वडिलांच्या आकस्मिक मृत्यूनंतर कुटुंबाची जबाबदारी खांद्यावर घेतली. वडिलांचा सात-बारा अशोक पांढरेंच्या नावावर झाला आणि प्रशासनाच्या नजरेतून अधिकृत शेतकरी म्हणून शिक्कामोर्तब झाले. वर्षानुवर्षे कोरडवाहू असणारी दोन एकर जमीन. गेल्या काही वर्षांपासून बागायती शेतीसाठी धडपड सुरू केली. मिळेल ते भांडवल गोळा करून उसाची शेती सुरू केली. गेल्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात अर्धा एकर ऊस कारखान्याला पाठविला. त्याचे बिल दोन टप्प्यात, तेही दोन महिन्यांपूर्वी मिळाले. प्रत्येक शेतकऱ्याची शेतीबाबतीत असणारी व्यथा पांढरेंच्याही नशिबी होतीच. उसाचे २२ हजारांचे बिल मिळाले. मात्र मिळालेले उत्पन्न आणि झालेला खर्च, याची सांगड कधीच बसली नाही. रोजगाराचे दुसरे साधन नाही. घरचा खर्च चालविण्यासाठी वर्षभरापूर्वी गाय घेतली. मात्र गाईच्या आजारपणामुळे तोटाच सहन करावा लागला. पुन्हा नव्या जिद्दीने नुकतीच एक गाय खरेदी केली. तिच्या दुधाच्या पैशावर घरखर्चाचा ताळमेळ घालण्याचा प्रयत्न सुरू होता. शेतीसाठी सोसायटी कर्ज घेतले होते. त्यातच वेळोवेळी येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी मित्र आणि नातेवाईकांकडून हातउसने पैसेही घेतले होते. मिळणारे उत्पन्न आणि होणारा खर्च, याचा हिशेब जुळेना. त्यातच मुलांच्या भवितव्याची सतावत असलेली चिंता. या नैराश्येच्या गर्तेत असणाऱ्या पांढरेंनी आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला. पांढरेंनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली आहे. त्यामध्ये जन्मदात्या आईला वृध्दापकाळात सुखी ठेवता आले नाही, याचीही खंत व्यक्त केली आहे. मुलांच्या शिक्षणासाठी जमीन विकण्याचाही उल्लेख चिठ्ठीत केला आहे. आत्महत्या करण्याऐवजी स्वत:ची जमीन विकण्याचा निर्णय घेतला असता तर...?, असाही प्रश्न अनेकांना पडेल. मात्र जन्मदात्या आईइतकेच काळ्या आईवर प्रेम करणारा कोणताही शेतकरी स्वत:ची जमीन विकण्याचे धाडस करू शकत नाही, हे वास्तव पांढरेंच्या बाबतीतही होते.मुलांच्या भवितव्याचे काय?अशोक पांढरे यांची मोठी मुलगी तासगावात अकरावीत विज्ञान शाखेचे शिक्षण घेत आहे. दहावीत तिने ८७ टक्के गुण मिळवून पटवर्धन कन्या प्रशालेत पहिला क्रमांक मिळवला होता. दहावीनंतर अभियंता होण्याची (अभियांत्रिकी पदविका करून पदवी घेण्याची) इच्छा असली तरी तिला घरच्या परिस्थितीमुळे अकरावीला प्रवेश घ्यावा लागला. त्याचीही खंत पांढरेंना होतीच. मुलगा तासगावच्या शाळेत नववीत आहे, तर लहान मुलगी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत सातवीत आहे. पांढरेंच्या आत्महत्येने या मुलांचे शैक्षणिक भवितव्य टांगणीला लागले आहे.आत्महत्या केवळ पन्नास हजारांसाठी अशोक पांढरे यांनी शेतीसाठी सोसायटीचे १८ हजार रुपये कर्ज घेतले होते, तर उसने घेतलेल्या कर्जाची रक्कम त्यांनी चिठ्ठीत उल्लेख केल्यानुसार २९ हजार ५०० रुपये होती. कर्जाचा आकडा पन्नास हजारांवर नव्हता. एवढ्याशा रकमेसाठी शेतकरी आत्महत्या करत आहे. अशी वेळ शेतकऱ्यांवर का येत आहे, याचा विचार कोठेच होत नाही.