शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

रमझान ईद शुभेच्या देण्यासाठी गेलेल्या शाबीरपटेल याची हत्या

By admin | Updated: July 8, 2016 22:11 IST

विजयपूर शहरात वर्षापूर्वी फय्याज मुश्रीफ याची हत्या करण्यात आली होती़ या हत्याकांडात सहभागी असलेला संशयित शाबीर पटेल (वय ४८, रा़ दरबार गल्ली विजयपूर) सध्या टाकळी

ऑनलाइन लोकमतविजयपूर : विजयपूर शहरात वर्षापूर्वी फय्याज मुश्रीफ याची हत्या करण्यात आली होती़ या हत्याकांडात सहभागी असलेला संशयित शाबीर पटेल (वय ४८, रा़ दरबार गल्ली विजयपूर) सध्या टाकळी, जिल्हा सोलापूर याची गोदावरी हॉटेल चौकात हत्या करण्यात आली़ ही घटना शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता घडली़ या घटनेनंतर विजयपूर जिल्हा रुग्णालय आणि गावात रात्री उशिरापर्यंत तणावपूर्ण वातावरण होते़ दरम्यान, संशयितांना अटक केली जात नाही तोपर्यंत मृतदेह स्वीकारणार नसल्याचा पवित्रा पटेल कुटुंबीयांनी घेतला़ त्यामुळे विजयपूर जिल्हा रुग्णालय परिसरात तणाव निर्माण झाला होता. सर्वांना शांततेचे आवाहन करून विजयपूर पोलीस तोडगा काढण्याचा प्रयत्न करत होते. शाबीर पटेल हे रमझान ईदनिमित्त मित्राला भेटण्यासाठी गेले होते. त्यास मारण्यासाठी दबा धरून बसलेल्या मारेकऱ्यांनी तो समोर येताच दोन गोळ्या झाडल्या़ त्यानंतर धारदार शस्त्रांनी हल्ला करून जखमी केले़ या हल्ल्यात शाबीरपटेल यांच्या शरीरातून रक्तस्राव झाला. शाबीरपटेल हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पाहून बघ्यांची गर्दी झाली. मात्र, भीतीने कोणीही जवळ गेले नाही. काही क्षणातच या घटनेची माहिती सगळीकडे पसरली. त्यानंतर शाबीरपटेल यांचे नातेवाईक घटनास्थळी आले. तोपर्यंत हल्लेखोर पसार झाले होते. कुटुंबीयांनी शाबीरपटेल यास उपचारासाठी जिल्हा रुग्णालात दाखल केले़ परंतु, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला़ या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गांधी चौक पोलीस स्टेशन येथे फिर्याद नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. त्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई, वडील भाऊ, असा परिवार आहे. (वार्ताहर)