शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस निरीक्षकासह अन्य दोघांवर खुनाचा गुन्हा

By admin | Updated: May 7, 2017 21:31 IST

पोलीस कोठडीतील मारहाणीत समशेर खान यांचा मृत्यू झाला होता. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने या प्रकरणाची चौकशी केली

ऑनलाइन लोकमतपरभणी, दि. 7 - पोलीस कोठडीतील मारहाणीत समशेर खान यांचा मृत्यू झाला होता. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने या प्रकरणाची चौकशी केली असून, चौकशीअंती ६ मे रोजी पोलिस निरीक्षक शेख अब्दुल रौफ यांच्यासह अन्य दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक भुमन्ना आचेवाड यांनी नानलपेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीत म्हटले आहे की, २५ डिसेंबर २०१६ रोजी पोलिस निरीक्षक शेख अब्दुल रौफ यांच्या अधिनस्त असलेल्या दोन कर्मचाऱ्यांनी समशेर खान समीर खान पठाण (३७, रा. मदिना पाटी) यास श्रीरामपूर पोलिस ठाण्यातील एका गुन्ह्यामध्ये ताब्यात घेतले. समशेर खान यास कायदेशीररित्या अटक केली नाही. तसेच नातेवाईकांना माहिती दिली नाही. स्टेशन डायरीमध्ये नोंद घेतली नाही, असे बेकायदेशीररित्या ताब्यात घेऊन सकाळी ११ ते सायंकाळी ६.२४ वाजेपर्यंत नानलपेठ पोलीस ठाण्यात डांबून ठेवले. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन झाले असून परभणी शहरातील तीन गुन्ह्यात समशेर खान याचा हात असावा, या संशयावरुन त्यास मारहाण करून ठार मारले, असे तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीवरून पोलीस निरीक्षक शेख अब्दुल रौफ, पोलीस हवालदार तुळशीदास देशमुख, पोकॉ. अ. मुश्ताक अ.मजीद यांच्याविरुद्ध कलम ३०२, ३३१, ४४८, ३४ भा.दं.वि. अन्वये नानलपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सीआयडीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर सुरडकर या प्रकरणाचा तपास करीत आहेत.