शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

कुख्यात गुंड नरेश चड्डी याची हत्या?

By admin | Updated: July 21, 2016 03:45 IST

गुंड नरेश चड्डी याला आपण मारल्याचा थेट उल्लेख केल्याने आता पोलिसांनी या संभाषणाच्या अनुषंगाने कृष्णानी याची चौकशी सुरू

उल्हासनगर : बांधकाम ठेकेदार दिनेश याला खंडणीकरिता धमकी देताना नगरसेवक गोदू कृष्णानी याने कुख्यात गुंड नरेश चड्डी याला आपण मारल्याचा थेट उल्लेख केल्याने आता पोलिसांनी या संभाषणाच्या अनुषंगाने कृष्णानी याची चौकशी सुरू केली आहे. उभयतांमधील सिंधीतील हे संभाषण व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल झाले. उल्हासनगरमधील रस्ता रुंदीकरणात एका दुकानावर कारवाई झाली होती. अर्धवट तुटलेल्या दुकानाच्या फेरबांधणीचा ठेका दिनेश या ठेकेदाराने घेतला होता. त्याच्याकडे नगरसेवक गोदू कृष्णानी याने अडीच लाखांच्या खंडणीची मागणी केली होती व त्याला ठार मारण्याची धमकी दिली होती. याबाबतची तक्रार ठेकेदाराने मध्यवर्ती पोलीस ठाण्यात केल्याने कृष्णानी याच्यासह दोघांवर खंडणीचा गुन्हा दाखल झाला. कृष्णानी याच्यावर यापूर्वी महापालिका अधिकाऱ्यांना धमकावल्याचा आरोप आहे.ठेकेदार व कृष्णानी यांच्यातील मोबाइल संभाषण व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल झाले. त्यामध्ये खंडणीकरिता धमकावताना कृष्णानी याने पप्पू कलानी याचा एकेकाळचा साथीदार व कुख्यात गुंड नरेश चड्डी याला आपणच मारल्याचा उल्लेख केला. चड्डी याचा मृतदेह दोन वर्षांपूर्वी त्याच्या घरात आढळला होता. त्या वेळी हा नैसर्गिक मृत्यू असल्याचा दावा पोलिसांनी केला होता. मात्र, आता कृष्णानी याच्या अप्रत्यक्ष कबुलीने पोलीसही चक्रावून गेले आहेत. ठाण्याचे सहपोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी या संभाषणाची गंभीर दखल घेऊन संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. >मोबाइल संभाषणातील आवाज आपला नसून हा आपल्याला फसवण्याचा प्रयत्न आहे. - गोदू कृष्णानी, नगरसेवक