शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील अट्टल गुंड लहू ढेकणे याचा खून

By admin | Updated: May 17, 2015 01:46 IST

पॅरोलवर बाहेर पडलेला पुण्याचा अट्टल गुंड लहू रामचंद्र ढेकणे (३९) याचा कोल्हापुरातील गिरगाव परिसरात निर्घृण खून झाल्याचे शनिवारी सकाळी उघडकीस आले.

कोल्हापूर/कळंबा : दोन खून प्रकरणांत जन्मठेपेची शिक्षा झालेला, तसेच कळंबा मध्यवर्ती कारागृहातून सहा महिन्यांपूर्वी पॅरोलवर बाहेर पडलेला पुण्याचा अट्टल गुंड लहू रामचंद्र ढेकणे (३९) याचा कोल्हापुरातील गिरगाव परिसरात निर्घृण खून झाल्याचे शनिवारी सकाळी उघडकीस आले. मारेकऱ्यांनी त्याचे शिर व हातांचे पंजे धडावेगळे करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.गिरगाव परिसरातील गवती डोंगरावर शनिवारी सकाळी साडेआठच्या सुमारास गुराख्यांना अज्ञात तरुणाचा शिर व दोन्ही हातांचे पंजे नसलेला मृतदेह दिसून आला. माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी तातडीने घटनास्थळी रवाना झाले. मृतदेहाच्या पँटच्या खिशातील डायरी व मतदान ओळखपत्रामुळे ढेकणे याची ओळख पटली; परंतु मृतदेह त्याचाच आहे का, याची खात्री करण्यासाठी त्याचा भाऊ अंकुश ढेकणे याला पोलिसांनी कोल्हापुरात बोलावून घेतले. त्याने मृतदेह ओळखल्यानंतर पोलिसांनी रात्रीच मारेकऱ्यांच्या शोधासाठी पुणे, सातारा, जयसिंगपूर, इचलकरंजी, कऱ्हाड, आदी परिसरात पथके रवाना केली. (प्रतिनिधी)पुणे-सातारा जिल्ह्यांत खंडणीसाठी दोन मुलांचे अपहरण करून खून केल्याप्रकरणी पुण्याच्या अतिरिक्त जिल्हा न्यायालयाने ढेकणेला फाशीची शिक्षा सुनावली. त्यानंतर त्याने शिक्षेस उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. यावर न्यायालयाने फाशीची शिक्षा रद्द करून जन्मठेपेमध्ये रूपांतर केले होते. नोव्हेंबर २०१४ मध्ये तो कोल्हापुरातील कळंबा मध्यवर्ती कारागृहातून पॅरोलवर सुटला होता.