शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

मुलीला दलममधून बाहेर काढण्यासाठी धडपडणाऱ्या वडिलाची हत्या

By admin | Updated: August 4, 2016 17:01 IST

नक्षलवाद्यांच्या दलममध्ये सहभागी असलेल्या आपल्या मुलीने समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील व्हावे, नक्षलवाद्यांच्या सोबत राहू नये, अशी तीव्र इच्छा असलेल्या मुलीच्या वडिलाची माओवाद्यांनी

ऑनलाइन लोकमतगडचिरोली, दि. ४ : नक्षलवाद्यांच्या दलममध्ये सहभागी असलेल्या आपल्या मुलीने समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील व्हावे, नक्षलवाद्यांच्या सोबत राहू नये, अशी तीव्र इच्छा असलेल्या मुलीच्या वडिलाची माओवाद्यांनी बुधवारी मध्यरात्री गळा कापून हत्या केल्याची घटना छत्तीसगड सीमेलगत असलेल्या धानोरा तालुक्यातील मोरचूल गावात घडली. या घटनेमुळे माओवाद्यांविषयी तीव्र संताप परिसरात व्यक्त केला जात आहे. या घटनेत ठार झालेल्या मृतकाचे नाव अंकालू नरोटे (५५) रा. मोरचूल तालुका धानोरा, जिल्हा गडचिरोली असे आहे.

अंकालू नरोटे हे मोरचूल या गावचे रहिवासी आहेत. हे गाव गडचिरोली- धानोरा- राजनांदगाव या आंतरराज्य महामार्गावरील सावरगावपासून तीन किमी अंतरावर वसलेले आहे. सावरगाव पोलीस मदत केंद्राच्या हद्दीत येणाऱ्या या गावातील अंकालूची २२ वर्षीय मुलगी सुशीला उर्फ राधा ही नक्षल दलममध्ये काही वर्षांपूर्वी सहभागी झाली. सुशीलाने आता दलम सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात दाखल व्हावे, अशी अंकालूची मनापासून इच्छा होती.

त्यांनी ही इच्छा सुशीला उर्फ राधा हिच्याकडे अनेकदा बोलून दाखविली. तू नक्षल दलम सोडून आमच्यासोबत राहण्यासाठी ये, असे ते वारंवार म्हणायचे. या बाबतची माहिती राधा उर्फ सुशीलाने माओवाद्यांकडेही बोलून दाखविली होती. वडिलांचा आपल्यावर सातत्त्याने याबाबत दबाव आहे, असे तिने माओवाद्यांना सांगितले. त्यामुळे संतप्त झालेल्या माओवाद्यांनी बुधवारी मध्यरात्री ११.३० वाजता मोरचूल गाव गाठले. गावात आल्यावर अंकालू नरोटेचे घर गाठून त्यांना आपल्या ताब्यात घेतले. बेदम मारहाण केली. पोरीला कशाला असा सल्ला देता, यावरून माओवादी संतप्त होते, अशी चर्चा परिसरात आहे.

त्यानंतर माओवाद्यांनी अंकालूची गळा कापून हत्या केली व मृतदेह महामार्गावर आणून टाकला. त्यानंतर नागरिकांनी गुरूवारी सकाळी सावरगाव पोलिसांना याची माहिती दिली. दुपारनंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह ग्रामीण रूग्णालय धानोरा येथे आणण्यात आला. बऱ्याच काळापासून अंकालू नक्षलवाद्यांच्या हिट लिस्टवर होता, अशी माहिती या घटनेनंतर पुढे आली आहे. गेल्या चार दिवसांत माओवाद्यांनी गडचिरोली जिल्ह्यात केलेली ही दुसरी हत्या आहे. एटापल्ली तालुक्यात एका युवकावर गोळ्या झाडून त्याला गंभीररित्या जखमी केले. माओवाद्यांचा शहीद सप्ताह ३ आॅगस्ट रोजी संपला. आतातरी हे हत्यासत्र थांबेल काय? असा प्रश्न दुर्गम भागातील नागरिक विचारत आहे.