शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

गरिबीला कंटाळून केली मुलाची हत्या

By admin | Updated: June 29, 2016 01:47 IST

मुलाचा सांभाळ करण्यासाठी आणि त्याच्या औषधांसाठी पैसे नसल्याने आईनेच पोटच्या मुलाची गळा आवळून हत्या केली.

मुंबई : मुलाचा सांभाळ करण्यासाठी आणि त्याच्या औषधांसाठी पैसे नसल्याने आईनेच पोटच्या मुलाची गळा आवळून हत्या केली. सोमवारी पहाटे ही घटना चेंबूरच्या सिंधी कॉलनी परिसरात घडली. आरसीएफ पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत मुलाच्या आईला अटक केली आहे. देवराज दुरनाले (६) असे या मृत चिमुरड्याचे नाव आहे. तो आई सवितासह राहत होता. मूळची कर्नाटक येथील राहणारी ही महिला १० वर्षांपूर्वी मुंबईत राहण्यास आली. तिचा पती मजुरीचे काम करत होता. ही महिला घरकाम करून मुलांचा सांभाळ करत होती. सहा वर्षांपूर्वी तिच्या दोन मुलींचा आजाराने मृत्यू झाला. त्यानंतर, पतीचेदेखील आजाराने निधन झाले. तेव्हापासून ती आणि मुलगा दोघेच चेंबूर कॉलनीत राहत होते. बेताची आर्थिक परिस्थिती, तसेच सर्व पगार भाडे भरण्यासाठीच जात होता. त्यामुळे दोघांना काही वेळा उपाशीच झोपावे लागत होते. महिन्याभरापूर्वी घर मालकाने घरभाडे वाढवले होते. मिळणाऱ्या पगारात हे वाढीव भाडे परवडणारे नसल्याने तिने ही बाब तिच्या ओळखीतल्या एका रिक्षाचालकाला सांगितली. त्याने तिची एका महिलेशी ओळख करून दिली. ती महिलादेखील त्याठिकाणी एकटीच राहत असल्याने, तिने तत्काळ तिला सोबत राहण्यासाठी होकार दिला. त्यानुसार, गेल्या आठ दिवसांपासून ही आरोपी महिला तिच्या मुलासह या महिलेकडे राहत होती. देवराजला फिट्स येत असल्याने, त्याला अनेकदा रुग्णालयात दाखल करावे लागत होते. मुलाच्या उपचारासाठी या महिलेने अनेकांकडून पैसेदेखील उसनवारीने घेतले होते. या सगळ््या प्रकाराला ही महिला कमालीची वैतागली होती.रविवारी रात्री तिच्यासोबत राहणारी महिला कामावर गेली असताना, तिने मुलाला ठार मारण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, तिने ओढणीच्या साहाय्याने देवराजची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर, त्याचा मृत्यू हा नैसर्गिक झाल्याचा बनाव तिने केला. यासाठी तिने मुलाला शताब्दी रुग्णालयात दाखल केले. ही बाब आरसीएफ पोलिसांना समजताच त्यांनी तत्काळ रुग्णालयात जाऊन मृतदेहाची पाहाणी केली. तेव्हा मुलाच्या मानेवर काही जखमा पोलिसांना आढळून आल्या. शवविच्छेदन अहवालामध्येदेखील मुलाचा मृत्यू गळा आवळून झाल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी सविताला ताब्यात घेतले. तिच्याकडे अधिक चौकशी केली असता, आपणच मुलाची हत्या केल्याचे तिने पोलिसांकडे कबूल केले. त्यानुसार, पोलिसांनी या महिलेस अटक केली आहे. (प्रतिनिधी)