शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
2
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
3
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
4
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
5
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
6
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
7
Sena-MNS Rally: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडेंनी घातलेल्या टी-शर्टनं वेधलं लक्ष!
8
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
9
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
10
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
11
"तुमचे बाप ज्यावेळी डायपरमध्ये होते तेव्हापासून हा माणूस.."; मराठी अभिनेता कोणावर भडकला? व्हिडीओ तुफान व्हायरल
12
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
13
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
14
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी
15
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
16
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
17
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
18
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
19
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश

मुख्य सचिव पदाची सूत्रे मल्लिक यांनी स्वीकारली

By admin | Updated: March 1, 2017 05:53 IST

सुमित मल्लिक यांनी मंगळवारी मावळते मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्याकडून मंत्रालयातील दालनात स्वीकारली

मुंबई : राज्याच्या मुख्य सचिवपदाची सूत्रे ज्येष्ठ सनदी अधिकारी सुमित मल्लिक यांनी मंगळवारी मावळते मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्याकडून मंत्रालयातील दालनात स्वीकारली. राज्याच्या चौफेर विकासासाठी प्रशासनाचे १०० टक्के सहकार्य असावे, यावर आपला भर असेल, असे मल्लिक यांनी सांगितले. १३ मार्च १९५८ रोजी जन्मलेले मल्लिक हे मूळचे कोलकाता येथील आहेत. ते १९८२मध्ये भारतीय प्रशासन सेवेत दाखल झाले. १९८३मध्ये नागपूर येथे सहायक जिल्हाधिकारी म्हणून त्यांच्या प्रशासकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. त्यानंतर सहायक जिल्हाधिकारी, गडचिरोली, अतिरिक्त जिल्हाधिकारी नागपूर, महाराष्ट्र हातमाग मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, मुंबईत अतिरिक्त जिल्हाधिकारी (यूएलसी) म्हणून त्यांनी काम पाहिले. जिल्हाधिकारी, मुख्य सचिव कार्यालयात सहसचिव, विभागीय आयुक्त, राज्यपालांचे सचिव, शालेय शिक्षण सचिव, राजशिष्टाचार विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. (विशेष प्रतिनिधी)>स्वाधीन क्षत्रिय सेवा हक्क आयुक्त मावळते मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांची नियुक्ती राज्य मुख्य सेवा हक्क आयोगाच्या आयुक्तपदी करण्यात आली आहे. ते राज्यपालांकडून बुधवारी शपथ घेतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सेवा हक्क कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आग्रही आहेत. हा कायदा पारदर्शक आणि गतिमान प्रशासनाच्या व्हिजनचा भाग मानला जातो. त्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी आयुक्त या नात्याने क्षत्रिय यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. ते आयोगाचे पहिले आयुक्त असतील.