अधिका:यांना पुन्हा रोखले : रहिवाशांविरोधात अवमान याचिका करणार
मुंबई : वरळीतील कॅम्पा कोला कम्पाउंडमध्ये असलेल्या इमारतींमधील अनधिकृत मजल्यांवर कारवाई करण्यास गेलेल्या पालिका प्रशासनाने आज रहिवाशांसमोर सपशेल नांगी टाकली. आज अनधिकृत मजल्यांचे पाणी, वीज आणि गॅसजोडणी तोडण्यास गेलेल्या पालिका अधिका:यांना रहिवाशांनी प्रवेशद्वारावरच रोखले. परिणामी रहिवाशांविरोधात सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करणार असल्याचे साहाय्यक पालिका आयुक्त आनंद वागराळकर यांनी सांगितले.
सकाळी सातपासून रहिवाशांनी कम्पाउंड परिसरात दोन्ही प्रवेशद्वारांसमोर होमहवनाला सुरुवात केली होती. शिवाय गुरुवारी रात्रीच रहिवाशांनी कुलूप ठोकत दोन्ही प्रवेशद्वारे बंद केली होती. सकाळी साडेअकरा वाजता पालिका अधिकारी प्रवेशद्वारासमोर दाखल झाले. या वेळी कम्पाउंडबाहेर शेकडो पोलिस तैनात होते. पालिका अधिका:यांनी रहिवाशांना आत येऊ देण्याची विनंती केली. मात्र रहिवाशांनी अधिका:यांची विनंती साफ धुडकावली. रहिवाशांनी मात्र ‘घर द्या, नाहीतर जीव घ्या’ अशा घोषणा देत अधिका:यांना रोखले. (प्रतिनिधी)
अधिका:यांची उडवाउडवीची उत्तरे
पोलीसबळाचा वापर करणार नसलो तरी कारवाई होणारच, असे वागराळकर वारंवार सांगत होते. मात्र प्रवेशद्वार बंद असताना बळाचा वापर केला नाही तर कारवाई होणार कशी, यावर मात्र ते उडवाउडवीची उत्तरे देत होते.