शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
3
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
4
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
5
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
6
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
7
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
8
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
9
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
10
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
11
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
12
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
13
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
14
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
15
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
16
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
17
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
18
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
19
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
20
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?

फेब्रुवारीत महापालिकांचा फड

By admin | Updated: January 9, 2017 05:30 IST

मार्च-एप्रिल महिन्यात मुदत संपणाऱ्या अकरा महापालिकांची निवडणूक फेब्रुवारीतच होणार असून, आयोगाने सर्व तयारी पूर्ण केली आहे

मुंबई : मार्च-एप्रिल महिन्यात मुदत संपणाऱ्या अकरा महापालिकांची निवडणूक फेब्रुवारीतच होणार असून, आयोगाने सर्व तयारी पूर्ण केली आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी माध्यमांशी बोलताना दिली.मुंबईसह ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, सोलापूर, नागपूर, अमरावती आणि अकोला या महापालिकांची मुदत मार्चमध्ये, तर उल्हासनगर व चंद्रपूर या महापालिकांची मुदत एप्रिलमध्ये संपत आहे. मुदत संपण्याच्या तारखेच्या सहा महिन्यांपर्यंत आधी निवडणूक घेता येते. त्यामुळे या ११ मनपांची मार्चमध्ये निवडणूक अपेक्षित होती. परंतु मार्चमध्ये दहावी आणि बारावीच्या परीक्षा असल्याने निवडणुका फेब्रुवारीत घेण्यात येणार असल्याचे सहारिया यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)जिल्हा परिषदांचे काय?रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, जळगाव, अहमदनगर, अमरावती, बुलडाणा, यवतमाळ, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, नागपूर, वर्धा, चंद्रपूर व गडचिरोली अशा २६ जिल्हा परिषदांची मुदत देखील मार्चमध्येच संपत आहे. ठाणे जिल्ह्याच्या विभाजनानंतर स्थापन झालेल्या पालघरच्या स्वतंत्र जिल्हा परिषदेची पहिली निवडणूकही याच वर्षाच्या पहिल्या तिमाहीत घेतली जाणे गरजेचे आहे. या निवडणुका कधी घोषित होतात, याकडेही लक्ष लागले आहे.मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, उल्हासनगर, नाशिक, ठाणे, नागपूर, चंद्रपूर, अकोला, अमरावती, सोलापूर या ११ शहरांमध्ये निवडणुकीचा धुव्वा उडेल.मुंबईसह ठाणे, नाशिक, पुणे, पिंपरी-चिंचवड व नागपूर या पाच महापालिकांमध्ये भाजप-शिवसेना या सत्ताधारी पक्षांसह कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. अनेक वर्षे सेनेच्या ताब्यात असलेल्या मुंबई महापालिकेत काय घडणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असणार आहे. मुंबईत भाजप-शिवसेना स्वतंत्र लढण्याच्या तयारीत असून युती होण्याची शक्यता जवळपास संपुष्टात आली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ‘होम टाऊन’ असलेली नागपूर महापालिका, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि अजित पवार यांचा बालेकिल्ला समजला जाणारे पुणे आणि पिंपरी-चिंचवड तर मनसे प्रमुख राज ठाकरे यांची सत्ता असलेल्या नाशिकमध्ये काय घडते, यावरच राज्यातील राजकारणाची पुढची दिशा स्पष्ट होईल. महापालिका निवडणुकांसंदर्भात निवडणूक आयोगाने सर्व तयारी पूर्ण केली असून महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना त्या संबंधी सूचित करण्यात आले आहे. येत्या आठवड्यात या निवडणुकांची अधिकृत घोषणा होईल.- जे. एस. सहारिया, निवडणूक आयुक्त