शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

कोंडी फोडण्यासाठी पालिका सरसावली

By admin | Updated: August 7, 2014 23:36 IST

उरुळी देवाची आणि फुरसुंगी येथील ग्रामस्थांनी कचरा डेपोवर येणा:या गाडय़ा अडविण्यास सुरुवात केली आहे.

पुणो : उरुळी देवाची आणि फुरसुंगी येथील ग्रामस्थांनी कचरा डेपोवर येणा:या गाडय़ा अडविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आज सलग दुस:या दिवशीही शहरातील कचरा शहरातच पडून असल्याने पुढील काही दिवस शहरातील कच:यावर नियंत्रण आणण्यासाठी महापालिका प्रशासनाने कंबर कसली आहे. येत्या काही दिवसांत 50 हून अधिक घरे असलेल्या सोसायटय़ांचा केवळ ओला कचरा महापालिकेकडून घंटागाडीद्वारे घेण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक सोसायटीने सुका कचरा आपल्या परिसरात विल्हेवाट लावण्यासाठी उपाययोजना करावी, अशा नोटिसा बजाविण्यात येणार असल्याची माहिती पालिकेतर्फे  देण्यात आली. अशा सूचना,  स्वच्छता निरीक्षक, आरोग्य निरीक्षक तसेच सहायक स्वच्छता निरीक्षकांना देण्यात आल्या आहेत. शहरात अशा सुमारे अडीच हजार सोसायटय़ांची माहिती महापालिकेकडे उपलब्ध आहे.
  उरुळी देवाची येथील कचरा डेपो बंद करून शहराच्या चार दिशांना कचरा प्रकल्प सुरू करावेत अशी मागणी उरुळी आणि फुरसुंगी येथील ग्रामस्थांनी केली आहे. या मागणीसाठी बुधवारपासून या दोन्ही गावांच्या ग्रामस्थांनी महापालिकेच्या कचरा डेपोवर येणा:या गाडय़ा अडविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे कचरा टाकण्यासाठी महापालिकेकडे जागाच उपलब्ध नाही. त्यामुळे आंदोलन चिघळल्यास ऐन पावसाळ्यात कोंडी नको म्हणून शहरातील जास्तीत जास्त कचरा प्रभागातच जिरविण्यासाठी महापालिकेने हालचाली सुरू केलेल्या आहेत. त्याअंतर्गत ज्या सोसायटय़ांमध्ये 5क् हून अधिक घरे आहेत, त्यांचा ओला कचरा पालिका घेणार आहे; मात्र सुका कचरा नाकारण्यात येणार आहे. त्याची सर्वस्वी जबाबदारी सोसायटीवर सोपविण्यात येणार असून तशी नोटीस या सर्व सोसायटय़ांना बजाविण्यात येणार आहे. तसेच सोसायटय़ांनी हा सुका कचरा रँगपिकर्सकडे द्यावा तसेच शक्य त्या कच:याचा पुनर्वापर करावा यासाठीही सोसायटीच्या पदाधिका:यांना सूचना देण्यात येणार असल्याचे  घनकचरा विभागाचे प्रमुख सुरेश जगताप आणि महापौर चंचला कोद्रे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
 
गांडूळखत प्रकल्प असल्यास कचरा घेणार नाही
ज्या सोसायटय़ांमध्ये गांडूळखत प्रकल्प सुरू आहेत, तसेच ज्या सोसायटय़ांनी ते उभारले आहेत; मात्र ते बंद आहेत, त्यांचा कोणताही ओला कचरा पुढील काही दिवस महापालिका घेणार नाही. तसेच ज्यांचे प्रकल्प बंद आहेत, त्यांना ते तत्काळ सुरू करावेत यासाठी सोसायटीच्या पदाधिका:यांना महापालिकेकडून सूचना देण्यात येणार आहेत. तसेच सूचना दिल्यानंतरही जे प्रकल्प सुरू होणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे.