शहरं
Join us  
Trending Stories
1
खासदार संजय राऊत यांची तब्येत बिघडली; मुंबईच्या फोर्टिस रुग्णालयात केले दाखल
2
"वादळांविरुद्ध लढण्यात एक वेगळीच मजा असते...", कोर्टाच्या निर्णयानंतर तेजस्वी यादवांची पहिली प्रतिक्रिया
3
फक्त २५,००० रुपये पगारात ईपीएफमध्ये १ कोटींचा फंड शक्य आहे! गुंतवणुकीचं गणित समजून घ्या
4
IND vs WI : दोन शतकवीरांसह शेपटीनं दमवलं! टीम इंडियावर चौथ्यांदा आली ही वेळ
5
दिवाळीत Kia च्या कार्सवर मिळतोय बंपर डिस्काऊंट, कंपनीनं आणल्या अनेक ऑफर्स; कोणत्या कारवर किती बचत?
6
भगवी वस्त्रे काढून फेकली, बुरखा घालून पळाली; हत्याकांडाची मास्टरमाईंड पूजा पांडे कुठे लपली होती?
7
सोनं, घर आणि... अनुपम मित्तल यांनी सांगितला श्रीमंतीचा कानमंत्र; म्हणाले तुम्हीही होऊ शकता अब्जाधीश
8
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 'दिवाळी जॅकपॉट'! महागाई भत्त्यात ३% ने वाढ; पाहा कोणाचा पगार किती वाढणार?
9
खंबीर साथ! बायकोला वर्ल्ड चॅम्पियन करण्यासाठी नवऱ्याने सर्वस्व पणाला लावलं, स्वप्न सत्यात उतरवलं
10
Ranji Trophy: बिग सरप्राइज! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या खांद्यावर उप-कर्णधारपदाची जबाबदारी
11
'काँग्रेसला सोबत घेण्याची राज ठाकरेंची इच्छा', संजय राऊतांचे मोठे विधान
12
लढाई थांबवा, भारत फायदा उठवेल ; अफगाणिस्तानसोबत झालेल्या लढाईवरून पाकिस्तानमध्ये वेगळीच चर्चा
13
धनत्रयोदशीपर्यंत १.३० लाखांपर्यंत जाऊ शकतं सोनं, पुढील वर्षी दीड लाखांचा टप्पा करणार पार, काय म्हणताहेत एक्सपर्ट?
14
Google Maps ला टक्कर देणार 'मेड इन इंडिया' App; 3D नेव्हिगेशनसह मिळतात अनेक फीचर्स, पाहा...
15
IND vs WI : जॉन कॅम्पबेलची विक्रमी सेंच्युरी! जे लाराला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
16
इस्त्रायल युद्ध थंडावले, पण गाझात अंतर्गत संघर्ष पेटला! हमास-दुघमुश टोळीच्या लढ्यात २७ ठार
17
धक्कादायक! "कल सुबह..." गाण्यावर मैत्रिणींसोबत नाचताना महिलेला आला हार्ट अटॅक
18
कारचा किरकोळ अपघात झालाय? लगेच विमा क्लेम करू नका! अन्यथा 'या' मोठ्या फायद्याला मुकाल
19
दिवाळीत 'लक्ष्मी' घरी आणायचीय? मग पाहा बाजारातील 'टॉप ५' स्कूटर! पेट्रोल की इलेक्ट्रिक? कोण देतंय बेस्ट डील?
20
मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार; पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्रात तांत्रिक बिघाड

पालिका आयुक्तांचा दरारा संपला

By admin | Updated: October 17, 2016 02:43 IST

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी धडक मोहीम राबवून शहरातील सर्व रस्ते व पदपथ अतिक्रमणमुक्त केले

नवी मुंबई : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी धडक मोहीम राबवून शहरातील सर्व रस्ते व पदपथ अतिक्रमणमुक्त केले होते. पण गत दोन महिन्यांमध्ये आयुक्तांचा दरारा कमी झाला असून फेरीवाल्यांनी पुन्हा रस्ते व पदपथ अडविले आहेत. महापालिकेच्या वाशी, कोपरखैरणे व घणसोली विभाग कार्यालयासाठी वाहन खरेदी करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीमध्ये मंजुरीसाठी आला होता. या विषयावर चर्चा करताना शहरातील अनधिकृत फेरीवाल्यांची स्थिती गंभीर झाली असल्याचे शिवसेनेचे नगरसेवक एम. के. मढवी यांनी निदर्शनास आणून दिले. ऐरोलीमधील अनेक रस्ते, पदपथ फेरीवाल्यांनी अडविले असल्याचे निदर्शनास आणून दिले. उपआयुक्त सुहास शिंदे यांनी फेरीवाल्यांवर नियमितपणे कारवाई केली जात असल्याचे सांगितले. यावर सभापतींनी वस्तुस्थिती वेगळी असल्याचे सांगितले. शहरात सर्वत्र फेरीवाल्यांनी पुन्हा अतिक्रमण केले आहे. यापूर्वी केलेली कारवाई व्यर्थ गेली असल्याचे सांगितले. विभाग अधिकारी व्यवस्थित काम करत नसल्याचेही सांगितले. आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी शहरातील सर्व अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई केली होती. व्यावसायिकांनी मार्जिनल स्पेसमध्ये केलेले अतिक्रमणही हटविले होते. अनेक फेरीवाल्यांनी स्वत:हून व्यवसाय बंद केले होते. पण दोन महिन्यांतच आयुक्तांचा दरारा कमी झाल्याने फेरीवाल्यांनी पुन्हा अतिक्रमण केले आहे. एपीएमसीच्या भाजी मार्केटमधील सर्व्हिस रोड भाजी व फळ विक्रेत्यांनी अडविला आहे. कोपरखैरणे सेक्टर १५ मध्ये मुख्य रोड अडवून व्यवसाय सुरू आहे. नेरूळ रेल्वे स्टेशन, सानपाडा, वाशी, ऐरोली, सीवूडमध्येही अशीच स्थिती असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरवात केली आहे. (प्रतिनिधी)