शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका आयुक्त, शहर अभियंत्याची बदली?

By admin | Updated: April 8, 2017 01:54 IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांच्यासह प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांच्यासह प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार आहेत. शासनाकडून शहर अभियंता आणण्यासाठी भाजपाच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत.राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ता आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. आयुक्त म्हणून दिनेश वाघमारे यांना पिंपरीत पाठविले होते. वाघमारे यांनी तत्कालीन सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चुकीच्या कामांना चाप लावण्याचे काम केले होते. शवदाहिनी, साहित्य खरेदी, मूर्ती खरेदी प्रकरणांची चौकशी लावली होती. तसेच घरकुलातील बोगस लाभार्थींवरही गुन्हे दाखल झाले होते. महापालिका निवडणुकीत सत्तांतर झाले आहे. राष्ट्रवादीची एकमुखी सत्ता जाऊन भाजपाची सत्ता आली आहे. आयुक्तांना पदोन्नती काही महिन्यांपूर्वीच मिळाली आहे. तसेच कौटुंबिक कारणामुळे मला मुंबईत बदली द्यावी, अशी त्यांनी शासनास विनंती केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासातील असल्याने लवकरच त्यांची बदली होणार अशी चर्चा महापालिकेत आहे.शासनाकडून प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकाऱ्यांशिवाय येत्या मेमध्ये कार्यकाल संपलेल्या महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे संकेत आयुक्तांनी दिले आहेत. त्यामुळे प्रशासनाने बदल्यांची कार्यवाही सुरू केली आहे. अधिकारी आणि कर्मचारी यांची यादी करून वर्षांनुवर्षे ठिय्या मांडलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणार आहेत. त्यामुळे राजकीय नेत्यांच्या संबंधित असणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. तर काहींनी राजकीय नेत्यांकडे आपल्या नावासाठी सेटींग सुरू केली आहे. पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले, ‘‘महापालिकेचे शहर अभियंता हे महत्त्वाचे पद आहे. योग्य नियोजन करणाऱ्या एकनाथ उगिलेंसारख्या शहर अभियंत्यांची शहरास गरज आहे. त्यामुळे शासनाकडून शहर अभियंतापदी अधिकारी मिळावा, यासाठी प्रयत्न करणार आहे.’’(प्रतिनिधी)>प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यांच्या बदलीचे संकेत अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे यांचा कालखंड संपला आहे. प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकाऱ्यांचा कालखंड संपलेला आहे. निवडणूक होताच सहायक आयुक्त डॉ. यशवंत माने यांची बदली केली आहे. तसेच सहायक आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांना अतिरिक्त आयुक्त म्हणून पदोन्नती मिळाली आहे. त्यामुळे आष्टीकर यांचीही बदली होऊ शकते. तसेच प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांचाही कार्यकाल संपला आहे. त्यांचीही बदली होऊ शकते.