शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
2
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
3
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
4
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
5
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
6
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले
7
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
8
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
9
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी
10
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
11
"तू जाताच पूजा यायची अन् पूर्ण दिवस आम्ही..."; नंदिनी हत्याकांडात ऑडिओ क्लीपनं नवा ट्विस्ट
12
चांगली भूमिका, चांगल्या सिनेमाचं आमिष, अभिनेत्रीवर बलात्कार, प्रसिद्ध अभिनेता अटकेत
13
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
14
iPhone 17 Series : आयफोन प्रेमींना मोठा झटका! नव्या 'आयफोन १७'साठी आता आणखी वाट बघावी लागणार; कारण काय?
15
नागपूर महामार्गावर 'टोल'मध्ये 'झोल'! एकाच क्रॉसिंगचे दोनदा कापले जाताहेत पैसे, तक्रारींचीही दखल नाही
16
RCB ला विजयी करणाऱ्या रजत पाटीदारने जिंकली दुलीप ट्रॉफी! सेंट्रल झोनचा साऊथवर धडाकेबाज विजय
17
Asia Cup 2025: आशिया कपमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे संघ, भारत कितव्या क्रमांकावर?
18
"माझ्या पतीचा श्वास सुरू होता, मी ओरडते होते, प्लीज आम्हाला..."; पत्नीने फोडला टाहो
19
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
20
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका

महापालिका : ५४

By admin | Updated: February 22, 2017 14:13 IST

महापालिकेचे नवे सत्ताधीश निवडण्यासाठी ५४ टक्के अमरावतीकर मतदारांनी मंगळवारी मतदानाचा हक्क बजावला.

महापालिका : ५४ $$अमरावती : महापालिकेचे नवे सत्ताधीश निवडण्यासाठी ५४ टक्के अमरावतीकर मतदारांनी मंगळवारी मतदानाचा हक्क बजावला. महापालिकेतील ८६ जागांसाठी घेण्यात आलेली निवडणूक निर्विघ्नपणे पार पडली. बहुतांश मतदान केंद्रावर दुपारनंतर मतदारांनी शिस्तीत रांगा लावून मतदान केले. महापालिका क्षेत्रातील सर्वच मतदानकेंद्रांवर दुपारी ३ नंतर मतदानाचा टक्का वाढला. सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत ५४.३० टक्के मतदारांनी मतदान केले.सन २०१२ ला सुद्धा सरासरी ५४ टक्के मतदार झाले होते. मंगळवारी प्रत्यक्ष मतदानानंतर ६२७ उमेदवारांचे भाग्य ‘ईव्हीएम’मध्ये बंद झाले. गुरूवार २३ फेब्रुवारीला येथिल विभागीय क्र ीडा संकुलातील इनडोअर हॉलमध्ये सकाळी ९ वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. मतदार याद्यांमधील गोंधळामुळे अनेक ठिकाणी मतदारांच्या उत्साहावर विरजण पडले. मतदार यादीतील घोळामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती तर काही ठिकाणी मतदान केंद्रात बसून मतदारांना धमकावण्याचा प्रकार उघड झाला. आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी युवा स्वाभिमान कार्यकर्त्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. महापालिका निवडणुकीत यंदा प्रथमच बहुसदस्यीय प्रभागपद्धतीचा अवलंब करण्यात आल्याने मतदारांना एकाच वेळी चार जणांना मतदान करावे लागले. अ,ब,क,ड हा क्रम चुकल्याने काही मतदान केंद्रांवर गोंधळ निर्माण झाला. महापालिकेच्या ८७ सदस्यीय सभागृहात भाजपच्या रीता पडोळे अविरोध निवडून आल्याने मंगळवारी २२ प्रभागातील ८६ जागांसाठी सकाळी ७.३० वाजता प्रत्यक्ष मतदानाला सुरूवात झाली. (प्रतिनिधी)मोरय्यांना बाहेर काढले४राजापेठ प्रभागातील युवा स्वाभिमान संघटनेच्या उमेदवार जयश्री मोरय्या या मतदानकें द्राच्या आवारात बसून मतदारांवर दबाव आणत असल्याच्या तक्रारीनंतर त्यांना मतदान केंद्राबाहेर काढण्यात आले. अंबिकानगरस्थित महापालिकेच्या हिंदी शाळेतील मतदान केंद्रावर हा प्रकार घडला. मतदारयादीत नाव सापडेना ४यंदाची सार्वत्रिक निवडणूक चारसद्स्यीय प्रभागपद्धतीने होत असल्याने प्रभागाची व्याप्ती वाढली आहे. सन २०१२ ची निवडणूक ४३ प्रभागात घेण्यात आली. या ४३ प्रभागांचे यंदा २२ प्रभागात विलिनीकरण करण्यात आल्याने प्रभागाच्या लोकसंख्येसोबतच मतदारांची संख्या वाढली. प्रभागाची व्याप्ती वाढल्याने मतदारांच्या नावांची अदलाबदल झाली. अनेकांना त्यांची नावे मतदारयादीत सापडू शकली नाहीत. तर अनेकांची नावे लगतच्या प्रभागामध्ये दिसून आल्याने मतदारांची वेळेवर धावाधाव झाली.