यदु जोशी- मुंबईचंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदीचा निर्णय घेतल्याबद्दल राज्याचे वित्त आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना जिवे मारण्याच्या धमक्या येत असून, तशी माहिती त्यांनी गृह विभागाला दिली असल्याचे सूत्रांनी सांगितले.२० जानेवारीला राज्य मंत्रिमंडळाने चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदीचा निर्णय घेतला. मुनगंटीवार यांनी त्यासाठी आग्रही भूमिका घेतली होती. मात्र या निर्णयामुळे मद्यसम्राट चांगलेच संतप्त झाले असून, मुनगंटीवार यांनी दारुविक्रेत्यांची तुलना दाऊदशी केल्याचा आरोप करीत त्यांनी शुक्रवारी चंद्रपूर पोलिसांत तक्रार नोंदविली. एवढेच नाही, तर वित्तमंत्री मुनगंटीवार यांना मोबाइलवर धमक्या येत आहेत.मला ठार करण्याच्याही धमक्या होत्या, पण अशा धमक्यांना मी कधीही घाबरलो नाही, अशी प्रतिक्रिया मुनगंटीवार यांनी दिली आहे. चंद्रपूरमध्ये दारुबंदीसाठी मोठी चळवळ उभ्या करणाऱ्या श्रमिक एल्गार संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष पारुमिता गोस्वामी यांनाही दोन वर्षांपूर्वी अशाच धमक्या येत होत्या.
मुनगंटीवार यांना जिवे मारण्याच्या धमक्या
By admin | Updated: January 24, 2015 02:31 IST