शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

मुनगंटीवारांनी ‘मोह’ आवरला!

By admin | Updated: April 10, 2015 08:42 IST

आदिवासींच्या आर्थिक विकासासाठी मोहाच्या फुलांपासून वायनरी उद्योगाला प्रोत्साहन द्या, असे सांगत विरोधक व सत्ताधारी आमदारांनी

मुंबई : आदिवासींच्या आर्थिक विकासासाठी मोहाच्या फुलांपासून वायनरी उद्योगाला प्रोत्साहन द्या, असे सांगत विरोधक व सत्ताधारी आमदारांनी अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना ‘मोहात’ पाडण्याचा प्रयत्न केला खरा; परंतु चंद्रपुरात दारूबंदी करणारे मुनगंटीवार वायनरीच्या मोहापासून चारहात दूरच राहिले. विदर्भातील आदिवासीबहुल अतिदुर्गम क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर मोहफुले येतात. त्यामुळे आदिवासींना उत्पन्न मिळावे, यासाठी या फुलांवरील बंदी उठवा, अशी मागणी करणारी लक्षवेधी संजय पुराम, डॉ. देवराम होळी, कृष्णा गजबे, राजेश काशिवार आदी सदस्यांनी लावली होती. त्यावर बोलताना वनमंत्री म्हणाले, मोहफुलावर वनविभागाने बंदी घातलेली नाही. मोहफुले वेचणे, जमा करण्यावर बंदी नाही. मात्र त्याची एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात वाहतूक करायची असेल तर १०० रुपये प्रति टन एवढे शुल्क राज्य उत्पादन विभागातर्फे आकारले जाते. याविषयी त्या विभागाशी चर्चा केली जाईल, असेही ते म्हणाले. वायनरी काढण्याची आवश्यकता नाही असे सांगून ते म्हणाले, ३३ प्रकारच्या वनउपजांचे फेडरेशन केले जाईल. त्यात व्हॅल्यू अ‍ॅडीशन करून त्याला उद्योगाचे रूप कसे देता येईल याचा विचार केला जाईल. आंबा, सफरचंद याहीपेक्षा मोहफुलात न्यूट्रीशन व्हॅल्यू जास्त आहे. त्यादृष्टीने हे फेडरेशन विचार करेल.