शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

मुंडे सूतगिरणीस अर्थसाहाय्य

By admin | Updated: September 2, 2015 01:08 IST

बाराव्या पंचवार्षिक योजनेमधून अर्थसाहाय्य करण्यासाठी लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे मागासवर्गीय सूतगिरणी (ता. केज, जि. बीड) व श्रीमंतराव मगरे कापूस उत्पादक

मुंबई : बाराव्या पंचवार्षिक योजनेमधून अर्थसाहाय्य करण्यासाठी लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे मागासवर्गीय सूतगिरणी (ता. केज, जि. बीड) व श्रीमंतराव मगरे कापूस उत्पादक मागासवर्गीय सहकारी सूत गिरणी (ता. बदनापूर, जि. जालना) या राज्यातील दोन मागासवर्गीय सहकारी सूतगिरण्यांची निवड करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी घेण्यात आला. अशाप्रकारे अर्थसाहाय्य मिळण्याकरिता नोंदणी केलेल्या १९ सूतगिरणी प्रतीक्षेत आहेत. या सहकारी सूतगिरण्यांची प्रकल्प अहवालानुसार किंमत ६१ कोटी ७४ लाख रुपये आहे. या सूतगिरण्यांना मंजूर आकृतीबंधाप्रमाणे अर्थसाहाय्य देण्यात येणार आहे. यापूर्वी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत केवळ जळगाव, यवतमाळ, औरंगाबाद, जालना, परभणी, बुलढाणा, नांदेड, अमरावती आणि बीड या कापूस उत्पादक जिल्ह्यातील ८० टक्के, तर उर्वरित क्षेत्रातील २० टक्के सहकारी सूत गिरणींना शासकीय अर्थसाहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मागासवर्गीय सहकारी सूतगिरणीसाठी सभासद भांडवल पाच टक्के, शासकीय भागभांडवल ४५ टक्के आणि शासकीय कर्ज ५० टक्के याप्रमाणे अर्थसाहाय्य करण्यात येते. या दोन्ही सूतगिरणींच्या उभारणीनंतर त्या क्षेत्रात रोजगार उपलब्ध होईल व शेतकऱ्यांच्या शेतमालास चांगला भाव मिळेल.आतापर्यंत १६ सहकारी सूत गिरण्यांचा वेगवेगळ््या पंचवार्षिक योजनेत समावेश करण्यात आला आहे. (विशेष प्रतिनिधी)