शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

मुंडे समर्थकांनी मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळला

By admin | Updated: July 10, 2016 15:30 IST

पाथर्डी शहरातील नाईक चौकात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुतळा युवक भाजपाचे कार्यकर्ते व मुंडे समर्थकांनी जाळला.

ऑनलाइन लोकमत 

पाथर्डी, दि. १० -  ग्रामविकास मंत्री  पंकजा मुंडे यांच्याकडची  जलसंधारण व रोजगार हमी योजनेची खाती काढून घेतल्याच्या निषेधार्थ पाथर्डी शहरातील नाईक चौकात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुतळा युवक भाजपाचे कार्यकर्ते व मुंडे समर्थकांनी जाळला.
 
यावेळी भाजपाचे युवामोर्चांचे शहराध्यक्ष मुकुंद गर्जे,गोकुळ दौंड,पप्पू बनसोड,पंचायत समिती माजी सभापती संपत कीर्तने आदि सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. खातेवाटपानंतर लगेचच पंकजा मुंडेंनी टि्वटरवरुन आपली नाराजी व्यक्त केली होती.
सिंगापूरमध्ये होणा-या वर्ल्ड वॉटर लीडर समिटला उपस्थित रहाण्याचे निमंत्रण मिळाले होते. पण आता मी त्या खात्याची मंत्री राहिली नसल्याने उपस्थित राहू शकणार नाही असे टि्वट पंकजा मुंडेंनी केले होते.
 
त्याला मुख्यमंत्र्यांनीही लगेच उत्तर दिले होते. पंकजा मुंडे यांनी वरिष्ठमंत्री या नात्याने  सरकारच्या प्रतिनिधी म्हणून वर्ल्ड वॉटर लीडर समिटला उपस्थित राहीले पाहिजे असे म्हटले होते.