शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मुंब्रावासियांचा पाण्याचा पुरवठा आठ एमएलडीने वाढविणार

By admin | Updated: March 10, 2016 20:32 IST

एमआयडीसीकडून मुंब्रा आणि कळव्यातील नागरिकांना सापत्न वागणूक मिळत असल्याने या भागात ४ दिवस शटडाऊन घेतले जात आहे.

 ऑनलाइन लोकमत 

ठाणे, दि. १० -  एमआयडीसीकडून मुंब्रा आणि कळव्यातील नागरिकांना सापत्न वागणूक मिळत असल्याने या भागात ४ दिवस शटडाऊन घेतले जात आहे. त्यामुळे इथल्या हजारों नागरिकांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबईच्या महापे गावातील एमआयडीसी कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढला. 
या मोर्चात ऋता आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली महिला मोठया संख्येने सहभागी झाल्या होत्या. या मोर्चाची दखल घेत पाणीपुरवठा अभियंता प्रकाश चव्हाण यांनी मुंब्रा कळव्याला ३२ एमएलडी वरून ४०.५०एमएलडी पाणीपुरठा करू असे आश्वासन दिले.  
मुंब्रा आणि कळवा ही शहरे ठाणे महानगर पालिकेच्या हद्दीतील आहेत. मात्र, असे असतानाही या शहरांना ठाणे महानगर पालिकेमार्फत थेट पाणी पुरवठा केला जात नाही. महाराष्ट्र औद्योगिक महामंडळामार्फत (एमआयडीसी) थेट पाणीपुरवठा केला जातो. 
परिणामी  या पाणी वितरणावर ठाणे महानगर पालिकेचे नियंत्रण नाही. म्हणून एमआयडीसी मनमानी पद्धतीने पाणीकपात करून मुंब्रा आणि कळव्यावर अन्याय करते. त्याकरिता या विभागातील हजारो नागरिकांनी गुरुवारी दुपारी भर उन्हात एमआयडीसी कार्यालयावर मोर्चा काढला. 
पाणी दो,  पाणी दो..कळवा मुंब्रापर अन्याय करना बंद करो, अशा घोषणा देत आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा एमआयडीसी गेटवर पोहचला. या गेटवर पोलिसांनी हा मोर्चा घडविला. त्यामुळे संतफ्त मोर्चेकऱयांनी डोक्यावरील मडके एमआयडीसीच्या दारात फोडून निषेध व्यक्त केला.  
यावेळी एमआयडीसी परिसर मोर्चेकऱयांच्या घोषणांनी दुमदुमून गेला होता. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिष्टमंडळाला घेऊन मुख्य अभियंता प्रकाश चव्हाण यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली असता, एरिगेशनच्या निर्णयाने पाणी कपातीचा निर्णय घेतला असल्याने मुंब्रा आणि कळव्याला कमी दाबाने पाणी पुरवठा केला जातो अशी माहिती दिली.तर आता आपण या शहरांना ३२ एमएलडी एवढे पाणी पुरवठा करीत असून लवकरच त्यात वाढ करू असे आश्वासन दिले. तर आव्हाड यांनी एमआयडीसीने इथल्या त्रस्त नागरिकांच्या रोषाला सामोरे जाऊ नये असा इशारा देत त्वरित या भागांना ३६ एमएलडी एवढे पाणी पुरवठा करावा अशी मागणी केली. 
तर,  पत्रकारांशी बोलताना आव्हाड यांनी ठाणे महानगर पालिकेतील सत्ताधाऱयांना टार्गेट करीत, सत्ताधार्यांनी २००३ मध्येच शाई धरण बांधण्याचा निर्णय घेतला असता तर आता ठाणेकरांवर पाण्यासाठी असे हात पसरावे लागले नसते, अशी खंत व्यक्त केली. दुसर्याकडे पाणी विकत घेऊनही ठाणे महानगर पालिकेचकडे पाणी वाटपाबाबतचे योग्य नियोजन नाही, अशी टीकाही आव्हाड यांनी केली. 
मुंब्रा आणि कळव्याला जास्त दाबाने पाणी पुरवठा व्हावा याकरिता येत्या शनिवारी पाहणे महानगर पालिकेचे अधिकारी, एमआयडीसीचे अधिकारी आणि येथील नगरसेवक यांची सकाळी १० वाजता मुंब्रा येथे एकत्रित बाबी वाटप आणि दाबासाठी बैठक होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.  
या मोर्च्यात ऋता आव्हाड, मुंब्रा प्रभाग समितीचे अध्यक्ष शानु पठाण, शमीम खान आदी मान्यवर आणि हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.