शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

मुंबईचे पाणी टेंशन मिटले

By admin | Updated: September 20, 2016 20:16 IST

काही दिवसांच्या विश्रांतीनंतर परतलेल्या पावसाने मुंबईला पाणीपुरवठा करणारी तलाव पुन्हा एकदा ओसंडून वाहू लागली आहेत.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. २० : काही दिवसांच्या विश्रांतीनंतर परतलेल्या पावसाने मुंबईला पाणीपुरवठा करणारी तलाव पुन्हा एकदा ओसंडून वाहू लागली आहेत. वर्षभर मुंबईकरांची तहान भागेल इतका हा जलसाठा आहे. त्यामुळे पुढच्या पावसाळ्यापर्यंतचे मुंबईचे पाण्याचे टेन्शन अखेर मिटले आहे.गेल्यावर्षी अपुऱ्या पावसामुळे मुंबईत पाणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली होती. ७० ते ७५ टक्केच तलाव भरले असल्याने वर्षभराची पाण्याची तजवीज करण्यासाठी मुंबई महापालिकेने २० टक्के पाणीकपात ऑगस्ट २०१५ पासून लागू केली. या कपातीची झळ मुंबईकरांना वर्षभर बसली. मात्र यावर्षी उशीरा हजेरी लवणाऱ्या पावसाने दोन महिन्यातच आपला बॅकलॉग भरुन काढला. तरीही सर्वच तलाव भरून वाही पर्यंत साबुरीचा मार्ग अवलंबणारया पालिका प्रशासनाला राजकीय दबावापोटी ही पाणीकपात दोन महिन्यापूर्वीच रद्द करावी लागली,मुंबईला वर्षभर पाणीपुरवठा सुरु राहण्यासाठी तलावांमध्ये १ ऑक्टबर रोजी तलावांमध्ये १४ लाख ४७ हजार जलसाठा असणे अपेक्षित आहे. मात्र गेले काही दिवस पावसाने विश्रांती घेतल्यामुळे तलावांची पातळी कमी होऊ लागली होती. हीच परिस्थिती काही दिवस कायम राहिल्यास मुंबईकरांवर पाण्याचे संकट घोंगावत होते. मात्र ब्रेक के बाद परतलेल्या पावसाने तलावांमध्ये एकूण ९९ टक्के जलसाठा जमा झाला आहे. पुढच्या जुलैपर्यंत मुंबईकरांसाठी हा पाणीसाठा मुबलक असल्याने पालिका अधिकाऱ्यांनीही सुटकेचा श्वास घेतला आहे. प्रतिनिधी चौकट मुंबईत दररोज ३७५० दशलक्ष लिटर्स पाणीपुरवठा होतो. मुंबईला वर्षभर पाणीपुरवठा सुरु राहण्यासाठी तलावांमध्ये १ ऑक्टोबर रोजी १४ लाख ४७ हजार दशलक्ष लिटर्स जलसाठा असणे अपेक्षित आहे. २० सेप्टेंबर २०१५ रोजी तलावांमध्ये केवल १० लाख दशलक्ष लिटर्स जलसाठा होता. यामुळे मुंबईकरांना वर्षभर २० टक्के पाणीकपातीचा सामना करावा लागला होता.