शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
3
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
4
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
5
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
6
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
7
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
8
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
9
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
10
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
11
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
12
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
13
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
14
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
15
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार
16
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
17
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
18
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
19
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
20
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?

मुंबईत शाळा झोपलेल्याच!

By admin | Updated: January 17, 2015 06:11 IST

पाकिस्तानामधील पेशावर येथील लष्कराच्या शाळेवरील अतिरेकी हल्ल्याने सारे जग सुन्न झाले़ दहशतवादाला रंग व धर्म नसतो

लोकमत टीम, मुंबईपाकिस्तानामधील पेशावर येथील लष्कराच्या शाळेवरील अतिरेकी हल्ल्याने सारे जग सुन्न झाले़ दहशतवादाला रंग व धर्म नसतो, हे या हल्ल्याने अधोरेखित झाले. या निर्दयी दहशतवादाने अनेक दु:खांवर एका गोंडस हसण्याने फुंकर मारणाऱ्या निष्पाप चिमुकल्यांना निर्घृणपणे संपवले. या घटनेने जगातील प्रत्येक पालकाच्या मनात काहूर माजले़ माझ्या मुलाची शाळा सुरक्षित आहे का, या प्रश्नाने पालकांची झोप उडाली़ प्रत्येक घराला बेचैन करणाऱ्या या प्रश्नाचा मागोवा घेण्यासाठी ‘टीम लोकमत’ने आकस्मिकपणे मुंबईतील सर्व स्तरातील शाळांना भेट दिली़ या भेटीने मुंबईतील शाळा सुरक्षेच्या बाबतीत अजूनही गाढ झोपेतच असल्याचे अत्यंत धक्कादायक वास्तव समोर आले़मुुंबई हे दहशवाद्यांच्या हिटलिस्टवर आहे, हे नव्याने सांगायला नको़ देशात कोठेही हल्ला झाला की मुंबईला सुरक्षेचा इशारा दिला जातो़ गेल्या महिन्यात झालेल्या पेशावर हल्ल्यानंतरही केंद्र सरकारने देशातील सर्व शाळांना सुरक्षेचे नियम धाडले़ पेशावर घटनेला आज जवळपास २० ते २५ दिवस उलटून गेले आहेत़ असे असताना मुंबईतील शाळांनीही सुरक्षेकडे प्राधान्याने कडेकोट लक्ष देणे आवश्यकच आहे़ शाळा मात्र अजूनही तुटपुंज्या सुरक्षा रक्षकांवर निर्भर आहेत; तर लष्कराच्या शाळांनी शस्त्रधारी जवान ठेवून पाठ थोपटून घेतली आहे. मात्र हे जवानही तितके सतर्क नसल्याचे वास्तव या ‘स्टिंग आॅपरेशन’मधून समोर आले. उच्च न्यायालयानेही एका निकालात मुलांच्या सुरक्षेची जबाबदारी शाळेची असल्याचा निर्वाळा दिला आहे़ हा निकाल गेल्या दशकातला आहे़ त्यामुळे शाळांना नव्याने सुरक्षेचे नियम धाडणे तितकेसे व्यवहार्य नाही़ मात्र काही शाळांनी सुरक्षेकडे लक्ष दिले आहे़ पालकाला ओळखपत्र देणे, अनोळखी व्यक्तीला शाळा आवारात न सोडणे यासह सुरक्षेची काळजी घेतली आहे़ मात्र अशा शाळा हाताच्या बोटांवर मोजण्याइतक्याच आहेत. अन्य शाळांनी याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. शाळेला किमान एक शस्त्रधारी सुरक्षा रक्षक असणे गरजेचे असल्याचा अनुभव या वेळी ‘टीम लोकमत’ला आला.