शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आठवडी बाजाराला मुंबईकरांचा प्रतिसाद; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

By admin | Updated: August 15, 2016 05:07 IST

राज्य सरकारने कृषीमाल नियमनमुक्त केल्यानंतर शेतीमाल थेट ग्राहकांच्या दारात विकण्याचे प्रयोग सुरू

मुंबई : राज्य सरकारने कृषीमाल नियमनमुक्त केल्यानंतर शेतीमाल थेट ग्राहकांच्या दारात विकण्याचे प्रयोग सुरू झाले असून, रविवारी विधान भवन परिसरात मुंबईतील पहिल्या संत शिरोमणी सावता माळी शेतकरी आठवडी बाजाराचे मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केले. थेट शेतातून आलेला हिरवागार ताजा भाजीपाला पाहून सुखावलेल्या मुंबईकरांनाही त्यास प्रतिसाद देत, मोठ्या प्रमाणात खरेदी केली.सहकार, पणन, वस्त्रोद्योग आणि राज्य कृषी पणन मंडळाच्या संयुक्त विद्यमाने विधान भवन परिसरात रविवारी पहिला आठवडी बाजार भरला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख, गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता, पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खा. राजू शेट्टी, खा. अरविंद सावंत यांच्यासह स्थानिक आमदार आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले की, ‘शेतकरी आठवडी बाजारात फक्त शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी उत्पादक सहकारी संस्था यांचा समावेश असणार आहे. बाजाराच्या माध्यमातून ग्राहकांना ताजा भाजीपाला व फळे एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत.’ (प्रतिनिधी)>मुख्यमंत्र्यांच्या भाजीचे सावंत यांनी दिले पैसे! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आठवडी बाजारातील सर्व स्टॉल्सना भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यांनी आदिवासी विकास विभागातर्फे लावलेल्या स्टॉलवर कुरडू, भारंगी, टाकला या रानभाज्यांसह इतर भाजीपाला घेतला. मात्र, त्यांच्याकडे पैसे नसल्याने शिवसेनेचे खा. अरविंद सावंत यांनी त्यांचे पैसे दिले. फडणवीस हे खा. राजू शेट्टी यांच्या स्टॉलवर पोहोचले. ढोबळी मिरची, कारले, हिरव्या मिरच्या तेथील स्टॉलवर होत्या. सदाभाऊ खोत यांनी स्टॉलवरील ताज्या हिरव्या मिरच्या मुख्यमंत्र्यांसमोर धरत ‘आमच्या हातात नेहमी मिरच्याच...’ अशी मिश्कील टिप्पणी करताच, मुख्यमंत्र्यांसह उपस्थितांनी हसून दाद दिली. >जलयुक्त शिवारनंतर मुख्यमंत्र्यांनी पाठबळ दिलेली ही दुसरी महत्त्वाकांक्षी योजना आहे. थेट बांधावरच्या शेतकऱ्याला मंत्रालयात आणता आले, याचे मोठे समाधान आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळवून देता आले. या पुढच्या काळात मुंबई उपनगरासह आठवडी बाजारांची संख्या १०० पेक्षा अधिक असेल. मुंबईकरांनी दिलेल्या प्रतिसादामुळे आमचे मनोबल वाढले आहे. - सदाभाऊ खोत, पणन राज्यमंत्री>शेतकऱ्यांना अडत्यांपासून मुक्त करून त्यांच्या श्रमाचे उचित मूल्य मिळवून देण्यासाठी शेतकरी गट आणि शेती उत्पादक कंपन्यांनी क्लस्टर तयार करावेत. त्यांच्या निर्मितीसाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा.- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री