शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईचा पुढचा महापौर आमचा!

By admin | Updated: December 26, 2016 05:16 IST

अगला महापौर किसका हो, भारतीय जनता पार्टी का हो...’ अशी नवी घोषणा भाजपाने रविवारी दिली.

मुंबई :  अगला महापौर किसका हो, भारतीय जनता पार्टी का हो...’ अशी नवी घोषणा भाजपाने रविवारी दिली. भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त परळ येथील कामगार मैदानात आयोजित कार्यक्रमात भाजपा नेत्यांनी मुंबईचा पुढचा महापौर भाजपाचाच असेल, असे जाहीर करत अप्रत्यक्षरीत्या महानगरपालिकेतील शिवसेनेची सत्ता संपुष्टात आणण्याचा निर्धारच व्यक्त केला.भारतीय जनता युवा मोर्चा मुंबईच्या वतीने कामगार कल्याण मैदानावर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे, राज्यमंत्री विद्या ठाकूर यांच्यासह मुंबईतील भाजपा नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते.देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अटल बिहारी वाजपेयी म्हणजे भारतीय राजकारणातील सुंदर स्वप्न आहे. भारतीय जनता पार्टीला आजचे स्थान मिळवून देण्यात वाजपेयी यांचा वाटा मोठा आहे. भ्रष्टाचारमुक्त भारतासाठी भारतीय जनता युवा मोर्चाने पुढाकार घ्यावा. देशात कॅशलेस व्यवहार कसा वाढेल यासाठी प्रयत्न करावेत. या वेळी मुख्यमंत्री फडणवीस वगळता प्रत्येक नेत्याने स्वबळाची घोषणा दिली. भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवाव्यात. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढचे सर्व पाहतील. भाजपाचे जे मंत्री झाले त्यांच्यापैकी कोणी वरिष्ठांची बॅग उचलली नाही. ज्यांनी उचलली ते बाहेर आहेत. ज्यांच्यात क्षमता आहे ते मंत्री झाले. त्यामुळे क्षमता सिद्ध करा, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे म्हणाले.राज्यात सर्वांत अधिक नगराध्यक्ष आणि नगरसेवक भाजपाचे आहेत. या निवडणुकांमध्ये आपल्याला १०० मार्क आहेत तर आपल्या मित्रपक्षाला चाळीसच मार्क आहेत. त्याची आपल्याशी बरोबरी होऊ शकेल का, असा सवाल करताना आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपाचाच महापौर व्हायला हवा, अशी घोषणा भाजपा संघटन मंत्री रवी भुसारी यांनी या वेळी केली. (प्रतिनिधी)संगीतकार साजिद यांचा भाजपा प्रवेशसंगीत दिग्दर्शक साजिद-वाजिद या जोडगोळीतील साजिद यांनी भाजपाच्या या सभेत पक्षात प्रवेश केला. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते साजिद यांचा सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी संगीतकार साजिद यांच्यासोबत ‘दिल दिया है, जां भी देंगे ऐ वतन तेरे लिए...’ हे गाणे गायले. मुख्यमंत्री गाणे गात असताना उपस्थितांनी उभे राहून दाद दिली.