शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईच्या आमदारांची ‘अळीमिळी गुपचिळी!’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2016 02:10 IST

राज्याच्या विधानसभेत आपले प्रश्न मांडण्यासाठी मुंबईकरांनी मतदानाद्वारे निवडून दिलेल्या आमदारांनी विधानसभेत मात्र चुप्पी साधली

मुंबई : राज्याच्या विधानसभेत आपले प्रश्न मांडण्यासाठी मुंबईकरांनी मतदानाद्वारे निवडून दिलेल्या आमदारांनी विधानसभेत मात्र चुप्पी साधली आहे. २०११ ते २०१४ या कालावधीत मुंबईतील आमदारांनी दरवर्षी सरासरी ९ हजार ६५५ प्रश्न विधानसभेत उपस्थित केले होते. याउलट २०१६ साली विधानसभेत केवळ ४ हजार ३४३ म्हणजेच ५० टक्क्यांहून कमी प्रश्न उपस्थित केल्याची माहिती समोर आली आहे.प्रजा फाउंडेशनने मंगळवारी जाहीर केलेल्या आमदारांच्या रिपोर्ट कार्डमध्ये ही धक्कादायक बाब समोर आली आहे. मुंबईतील एकूण ३६ आमदारांपैकी चार मंत्री आणि उशिराने निवड झालेल्या आमदार तृप्ती सावंत यांना वगळल्यास उरलेल्या ३१ आमदारांचे रिपोर्ट कार्ड प्रजाने या वेळी मांडले. त्यात केवळ ७ आमदारांनी एका वर्षात १५० हून अधिक प्रश्न उपस्थित केले. तर १८ आमदारांनी ५० ते १५० प्रश्न उपस्थित केले आहेत. याउलट ६ आमदारांनी वर्षभरात ५० प्रश्नही उपस्थित केले नसल्याची माहिती प्रजाने माहिती अधिकारातून मिळवली आहे.प्रजा फाउंडेशनचे विश्वस्त निताई मेहता म्हणाले की, सदनामध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचा दर्जा, प्रश्नांची संख्या, आमदारांची उपस्थिती, गुन्हेगारी रेकॉर्ड, कथित किमान भ्रष्टता, संबंधित निर्वाचन क्षेत्रापासून जनतेसाठी कथित सुगम्यता, निर्वाचन क्षेत्रासाठी कथित प्रदर्शक या सर्व गोष्टी समोर ठेवून आमदारांना गुण देण्यात आले आहेत. आमदारांना दिलेल्या गुणतालिकेत मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार अमिन पटेल यांना प्रथम क्रमांक देण्यात आला आहे. त्यांनी ८० टक्क्यांहून अधिक गुण मिळवले आहेत. तर सर्वात शेवटचा क्रमांक भारतीय जनता पार्टीचे आमदार राम कदम यांचा असून त्यांना प्रजाच्या रिपोर्ट कार्डमध्ये ५० टक्के गुणांचीही कमाई करता आली नाही. सर्वोत्कृष्ट १० आमदारांत पाच आमदार काँग्रेसचे, तीन शिवसेनेचे आणि दोन आमदार भाजपाचे आहेत. (प्रतिनिधी)>आमदारांच्या प्रश्नांचा दर्जा घसरतोययाआधी २८ आमदारांनी विधानसभेत सरासरी प्रश्न उपस्थित केले होते, तर ५ आमदारांनी विचारलेल्या प्रश्नांचा दर्जा खालावलेला होता. दरम्यान, एकाही आमदाराने चांगल्या दर्जाचा प्रश्न उपस्थित केला नव्हता. याउलट या वर्षी एका आमदाराने चांगल्या दर्जाचे प्रश्न उपस्थित केले आहेत.मात्र सरासरी दर्जाचे प्रश्न उपस्थित करणाऱ्या आमदारांची संख्या २० पर्यंत खालावली असून खालावलेल्या दर्जाचे प्रश्न विचारणाऱ्या आमदारांच्या संख्येत १० पर्यंत वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईतील आमदारांच्या प्रश्नांचा दर्जा खालावतोय, असा आरोप प्रजाने केला आहे.>आमदार साहेब भेटेना...विभागातील समस्या ऐकून घेण्यासाठी मतदारांना आमदारांची उपलब्धता आवश्यक असते. २०११-१४ दरम्यान सरासरी १ आमदाराचा नागरिकांशी उत्तम संपर्क होता. तर १७ आमदार लोकांना सरासरी भेटत असून १५ आमदार नागरिकांसाठी उपलब्ध नसल्याचे समोर आले होते. याउलट यंदा एकही आमदार उत्तम प्रकारे नागरिकांना वेळ देत नसल्याचे प्रजाने मांडले आहे. तर केवळ ६ आमदार लोकांना सरासरी उपलब्ध होत असून २५ आमदार लोकांना भेटतच नसल्याचे प्रजाने सांगितले.>अमिन पटेल सर्वोत्कृष्ट आमदारकाँग्रेस आमदार अमिन पटेल यांना सर्वोत्कृष्ट आमदाराचा दर्जा प्रजा फाउंडेशनने मांडलेल्या अहवालात मिळाला आहे. आॅक्टोबर २०१४ ते मार्च २०१६ दरम्यान पटेल यांनी विधानसभेत सर्वाधिक म्हणजेच १ हजार ५५ प्रश्न उपस्थित केले आहेत. त्याखालोखाल अस्लम शेख (४८७), सुनील प्रभू (२६१) आणि वर्षा गायकवाड (२४०) यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे पटेल यांनी विचारलेल्या प्रश्नांची संख्या त्यांच्या खालोखाल असलेल्या तिन्ही आमदारांनी विचारलेल्या प्रश्नांच्या संख्येच्या बेरजेहून अधिक आहे.